Water Spinach : पाणथळ जमिनीमध्ये पाणपालक ठरू शकतो फायद्याचा

पाणथळ असलेल्या जमिनीमध्ये फारशी पिके घेता येत नसल्यामुळे त्या पडीक राहतात. जमिनी असूनही शेतकऱ्यांना भूमिहीनांप्रमाणे अन्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करावी लागते. अशा पाणथळ जमिनीमध्येही पाणपालकाचे चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू शकत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.
Water Spinach
Water SpinachAgrowon

पाणथळ असलेल्या जमिनीमध्ये (Wetland) फारशी पिके घेता येत नसल्यामुळे त्या पडीक राहतात. जमिनी असूनही शेतकऱ्यांना भूमिहीनांप्रमाणे अन्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजुरी करावी लागते. अशा पाणथळ जमिनीमध्येही पाणपालकाचे चांगले उत्पादन (Water Spinach Production) व उत्पन्न मिळू शकत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. ‘काशी मनू’ या पाणपालक जातीपासून (Kashi Manu Spinach Verity) वर्षभर खुडणी पद्धतीने १०० टन प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते. साधारण १.५ लाख रुपये उत्पादन खर्च असलेल्या या पिकांतून १२ ते १५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकत असल्याचे प्रात्यक्षिकांमधून दिसून आले आहे.

Water Spinach
Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

पाणपालक (वॉटर स्पिनॅच) ही पाण्यामध्ये किंवा पाणथळ जागेमध्ये उगवणारी पालेभाजी खनिजे, जीवनसत्त्वे आणि प्रथिनांचा एक चांगला स्रोत ठरू शकते. या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त ठरते. भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यातील लोहाचे अधिक प्रमाण होय. कारण भारतीय महिला आणि लहान मुलांमध्ये अॅनिमियाचे (रक्ताल्पता) प्रमाण मोठे असून, त्यामध्ये ही पालेभाजी उपयोगी ठरू शकते. कोवळ्या स्वरूपामध्ये तोडणी केल्यास या पालेभाजीचे बहुतांश सर्व भाग हे खाद्य उपयोगी आहेत.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या सामान्यतः पडीक राहणाऱ्या पाणथळ जमिनीत या पालेभाजीची वाढ चांगल्या प्रकारे होते. मात्र पाण्यामध्ये याची लागवड केली जात असल्यामुळे पीक संरक्षणासाठी हानिकारक कीडनाशकांचा वापर करता येत नाही. संपूर्ण सेंद्रिय व शास्त्रीय पद्धतीने या पिकाची वाढ करण्यासंदर्भात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये अभ्यास करण्यात आला. त्यातून आश्‍वासक निष्कर्ष हाती आले आहेत. ही पालेभाजी वर्षभर घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देते.

Water Spinach
Agriculture Technology : टरफलासह शेंगांचा ‘एक्स-रे’ देईल गुणधर्माची माहिती

या पालेभाजीची पाने खुडून घेत गेल्यास एकापेक्षा जास्त वेळा उत्पादन हाती येते. तसेच ते वर्षभर घेता येते. फक्त हे पाणपालक पाण्यामध्ये घेतले जात असल्यामुळे पाण्याचा दर्जा उत्तम आणि प्रदूषणरहित ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात. त्यातून ग्राहकांना सुरक्षित अशी औषधी गुणधर्मयुक्त आणि पोषक घटकांनी परिपूर्ण अशी पालेभाजी वर्षभर पुरवता येते. तिची लागवड बियांपासून आणि शाकीय पद्धतीनेही करता येते. अशा साऱ्या घटकांमुळे पाणपालकांची ‘काशी मनू’ ही जात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

तंत्रज्ञानाचा परिणाम

योग्य व शास्त्रीय पद्धतीने पाणपालकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पाणथळ जमिनीतूनही चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते, ही बाब प्राथमिक चाचण्या आणि प्रयोगातून सिद्ध झाली. त्यानंतर या लागवड तंत्रज्ञानाचा विस्तार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश अशा राज्यांतील शेतकऱ्यांमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून वाराणसी येथे २.२ हेक्टर, मिर्झापूर १.८ हेक्टर, चांदौली ०.२ हेक्टर, सोनेभद्रा ०.८ हेक्टर, गाझीपूर ०.२ हेक्टर, मौ ०.२ हेक्टर, जौनपूर ०.६ हेक्टर, अयोध्या ०.२ हेक्टर, बलिया ०.४ हेक्टर, कुशिनगर ०.२ हेक्टर लागवड करण्यात आली. सोबतच एक हजारापेक्षा अधिक कुटुंबांना परसबाग किंवा टेरेसवरील बागेमध्ये लागवडीसाठी लागवड साहित्य पुरवण्यात आले.

व्यावसायिक लागवडीतून मिळाला भरघोस फायदा

१) काशी मनू या पाणपालकाच्या जातीची व्यावसायिक पद्धतीने लागवड करणारे प्रगतिशील शेतकरी पुढील प्रमाणे -

- प्रताप नारायण मौर्य, अल्लाद्दिनपूर, वाराणसी

- अखिलेश सिंग, चितकपूर, मिर्झापूर

- सुभाष के. पाल, कुत्तूपूर, जौनपूर

२) या शेतकऱ्यांना या पालेभाजीचे १०० टन प्रति हेक्टर इतके

उत्पादन मिळाले.

३) त्याचा उत्पादन खर्च १.४ लाख ते १.५ लाख प्रति हेक्टर इतका झाला.

४) या पाणपालकाला १५ ते २० रुपये प्रति किलो असा सरासरी दर मिळाला.

५) त्यातून वर्षभरामध्ये १२ लाख ते १५ लाख रुपये प्रति हेक्टर प्रति वर्ष इतके उत्पन्न मिळाले.

वेगाने होतोय विस्तार

विविध ठिकाणी घेतलेल्या प्रात्यक्षिक क्षेत्र आणि व्यावसायिक पद्धतीने मिळालेल्या भरघोस फायदा यामुळे शेतकऱ्यांमध्ये पाणपालकाची लोकप्रियता वेगाने वाढत आहेत. त्यांच्या लागवड साहित्याची विशेषतः बिया आणि रोपांची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे काही तरुण शेतकरी त्याची रोपवाटिका करू लागले आहेत.

हे पीक मानवी आहारासाठी चांगले आहेच, पण त्याचा वापर हिरव्या चाऱ्याच्या स्वरूपातही जनावरांसाठी करता येतो. अशा प्रकारे वापर केल्यानंतर जनावरांच्या आरोग्यामध्येही चांगले परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे. मात्र त्यावर अद्याप संशोधन झालेले नाही. सेंद्रिय किंवा नैसर्गिक पद्धतीने उत्पादनासाठी हे पीक उपयोगी ठरू शकते.

(स्रोत ः भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com