Hydroponics Technique : काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्र..

नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक म्हणतात. हायड्रोपोनिक शेती पाणी, वाळू किंवा खडीमध्ये केली जाते.
Hydroponic Farming
Hydroponic FarmingAgrowon

शेतातली काळी माती (Soil) म्हणजे आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी आई. काळ्या मातीत रोप उगवतं, पीक फुलतं, बळीराजा सुखी होतो. माती शेतीलाच नाही तर सगळ्या जगाला जगवते असं म्हटलं तरी चुकीच ठरणार नाही. पण काळ बदलतो आहे, परिस्थिती बदलत आहे आणि त्यासोबतच शेती (Agriculture Method) करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पारंपारिक शेतीमध्ये (Traditional Agriculture) असे अनेक बदल केले आहेत ज्यामुळे शेतीची कामे सोपी, सोयीस्कर आणि चांगली झाली आहेत. यातील एक बदल म्हणजे मातीविना शेती. म्हणजेच हायड्रोपोनिक्स शेती. (Hydroponics Agriculture)

Hydroponic Farming
Modern Agriculture : प्रशिक्षणांती किफायतशीर शेती

काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्र..

नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक म्हणतात. हायड्रोपोनिक शेती पाणी, वाळू किंवा खडीमध्ये केली जाते. या तंत्रात पीक पाण्याद्वारे आणि त्याच्या पोषण स्थितीद्वारे वाढते. आजकाल अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे सुपीक माती उपलब्ध नसते.

हायड्रोपोनिक तंत्राचा वापर करून इमारतीच्या छतावर, मुंबई सारख्या जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी शेती सहज करता येते. या प्रकारच्या शेतीमध्ये पारंपारिक शेतीच्या तुलनेत केवळ 10% पाणी लागते. या पद्धतीत, वनस्पतीला फक्त तीन महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते - पाणी, प्रकाश आणि पोषक तत्व.

Hydroponic Farming
Modern Agriculture : व्यवस्थापनातील सुधारणांद्वारे शेतीत जपली गुणवत्ता

हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून जमिनीच्या वरच्या बाजूला शेती केली जाते, त्यासाठी मातीऐवजी वाळलेल्या नारळाच्या सालीपासून बनवलेले विशेष पदार्थ वापरतात, ज्याला कोकोपीट म्हणतात. या पद्धतीने घेतलेल्या पीक तंत्राने लागवड करून तुम्ही शिमला मिरची, कोबी, बटाटा, गुलाब, कारलं, काकडी, पालक, टोमॅटो, धणे, मिरची, तुळस आणि इतर अनेक फळभाज्या वाढवू शकता.

शासनाकडून अनुदान

भारतातील केंद्र आणि राज्य सरकार हायड्रोपोनिक्समध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी भांडवली खर्चावर सबसिडी देते. अनुदान राज्यानुसार बदलते. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने पशुखाद्य वाढवण्यासाठी हायड्रोपोनिक्सचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना ५०% अनुदान दिले आहे.

Hydroponic Farming
Hydroponic Farming : जाणून घ्या हायड्रोपोनिक शेतीचे तंत्र

त्याचप्रमाणे, राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून (NHB) प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्रपणे अनुदान उपलब्ध आहे. त्याच्या संबंधित राज्याचा तपशील मिळविण्यासाठी, शेतकऱ्याला NHB च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि त्यांच्या राज्यात उपलब्ध असलेल्या सबसिडी आणि योजना शोधाव्या लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

सिटी ग्रीन्स ही भारतातील एक मोठी हायड्रोपोनिक्स कंपनी आहे, जी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिली जाणारी हायड्रोपोनिक्स सबसिडी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. पॉलीहाऊसमध्ये सिमला मिरची, टोमॅटो किंवा काकडी यांसारखी फळे आणि भाजीपाला पिकविण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान उपलब्ध आहे. या अनुदानाअंतर्गत सरकार शेतकऱ्याला खर्चाच्या ५०% रक्कम देते. या अनुदानासाठी बँकेचे कर्ज घेणे आवश्यक आहे आणि याशिवाय लागणाऱ्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यास देखील सिटी ग्रीन्स मदत करते.

हरिद्वारमध्ये लवकरच सिटी ग्रीन्सचा एक प्रकल्प येणार आहे जो या भागातील सर्वात विकसित हायड्रोपोनिक प्रकल्प असेल. एक एकर परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. यामध्ये हिवाळ्यात सिमला मिरची आणि उन्हाळ्यात इंग्रजी काकडीची लागवड केली जाईल.

तांत्रिक दृष्टिकोनातून, हा एक अत्यंत विकसित प्रकल्प आहे ज्यामध्ये मशीनद्वारे काम केली जातील. झाडांना पाणी केव्हा द्यायचे, खत किती द्यायचे, खते किती प्रमाणात घ्यायची, फॉगर केव्हा चालवायचे, पॉलीहाऊसचे पडदे कधी वर करायचे आणि खाली करायचे असे मानवी निर्णय सिटी ग्रीन्सने विकसित केलेल्या ऑटोमेशन तंत्रज्ञानाद्वारे घेतले जातील. त्यामुळे पीक वाढेल आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com