बैलचलित सौर फवारणी यंत्र का वापरावे?

लहान व मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन बैलचलित सौर फवारणी यंत्र तयार केलेले आहे.
Bullock Drawn Solar Spraying Machine
Bullock Drawn Solar Spraying Machine Agrowon

खरीप हंगामात सध्या विविध पिकांमध्ये कीड-रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या शिवाय तणांचाही प्रश्न आहे. ही कामे मजुरांकडून करून घ्यावी लागतात. त्यामुळे पिकाचा उत्पादन खर्च वाढतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१८ मध्ये बैलचलित फवारणी यंत्र (Bullock Drawn Solar Spraying Machine) विकसित केले. हे यंत्र सौर ऊर्जेवर (Solar Energy) चालते. लहान व मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे यंत्र तयार केलेले आहे. या यंत्रामुळे मजुरी, वेळ, कष्टाची बचत होते. शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.


या यंत्राद्वारे सर्व पिकांमध्ये तणनाशक आणि किडनाशकाची फवारणी करता येते. हे यंत्र सौर उर्जेवर चालते. त्यामुळे फवारणीच्या खर्चात बचत होते.

Bullock Drawn Solar Spraying Machine
डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्वयंचलित फवारणी यंत्र

यंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत?
- या यंत्रामध्ये १२ नोझल दिलेले आहेत. त्यामुळे ८.२ ते ८.५ लिटर प्रति मिनिट या वेगाने किडनाशकाची किंवा तणनाशकाची फवारणी होते.
- यंत्राची उंची जमिनीपासून १२० सेंटीमीटर आहे. हे यंत्र एका मजुराकडून चालविता येते.
- फवारणी करणारी व्यक्ती नोझलमधून होणाऱ्या फवारणीपासून दूर राहत असल्यामुळे या यंत्राद्वारे फवारणी करताना होणारे दुष्परिणाम टाळले जातात.
- सर्व पिकांमध्ये तणनाशक व किडनाशकाच्या फवारणीसाठी उपयुक्त आहे.

फायदे कोणते आहेत?
- हे यंत्र चालविण्यासाठी एका मजुराची गरज लागते.
- प्रदूषणरहित फवारणी करता येते. इंधन किंवा इतर ऊर्जेची आवश्यकता नसते.
- पिकाच्या उंचीनुसार बुमची उंची कमी जास्त करता येते. त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. सुलभपणे फवारणी करता येते.
- पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये ५० टक्के बचत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com