चंद्रशेखर राव देणार शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ३ लाख

देशभरातील ७५० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत (Financial Assistance) दिली जाणार असल्याचे स्पष्ट करत चंद्रशेखर राव यांनी त्यासाठी २२.५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याचेही नमूद केलंय.
Telangana government will provide Rs 3 lakh
Telangana government will provide Rs 3 lakh

किसान आंदोलनात (Kisan Andolan) मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली आहे. 

मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात झालेल्या किसान आंदोलनात (Kisan Andolan) देशभरातील ७५० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वच शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत (Financial Assistance) दिली जाणार असल्याचे स्पष्ट करत चंद्रशेखर राव यांनी त्यासाठी २२.५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केल्याचेही नमूद केलंय.

हेही वाचा-मेडिकल स्टुडंट्सबाबत सकारात्मक निर्णय ?        तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) सध्या केंद्र सरकारविरोधी आघाडीसाठी विविध राज्यांतील समविचारी पक्षांच्या गाठीभेटी घेत आहेत. राव यांनी शुक्रवारी ( दिनांक ४ मार्च) भारतीय किसान युनियनचे (Bhartiya Kisan Union) प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) आणि केंद्रीय नेतृत्वावर घमासान टीका करणारे भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Dr. Subramanian Swamy)  यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

शेतकरीविरोधी धोरणे राबवणारे मोदी सरकार आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत (Financial Assistance) करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगत चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा सरकार संबंधित कुटुंबांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत देणार असल्याचे स्पष्ट केले. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे राव म्हणालेत.

दिल्लीच्या सीमेवरील किसान आंदोलन (Kisan Andolan) स्थगित करताना संयुक्त किसान मोर्चातर्फे (Sanyukt Kisan Morcha )करण्यात आलेल्या मागण्यांत आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीचाही समावेश होता. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप त्याबाबत काहीच पावले उचलण्यात आलेले नाही.     

केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे संतप्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांनी भाजपविरोधात आता राजकीय आघाडीवर संघर्ष करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी समविचारी मित्र पक्षांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलीय.

व्हिडीओ पहा- 

टिकैत आणि स्वामी यांच्या भेटीत चंद्रशेखर राव यांनी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. तसेच तेलंगणा सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काय प्रयत्न करत आहे, याचीही माहिती टिकैत यांना दिलीय. 

राज्यातील तांदळाची हमीभावाने खरेदी करायला नकार दिल्यामुळे मोदी सरकारवर रुष्ट के.चंद्रशेखर राव यांनी यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) , द्रविड मुन्नेत्र कझघमचे एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin),  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतलेली आहे. लवकरच ते आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal ) यांची भेट घेणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com