यंदाच्या खरिपात १६३ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

या खरिपासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलबिया लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे आवाहन केले आहे.खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी व उत्पादनातील तफावत भरून काढायची असेल तर देशातल्या विविध राज्यात तेलबिया लागवडीचे प्रमाण वाढायला हवे.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

केंद्र सरकारने यंदाच्या २०२२-२०२३ (जून ते जुलै) खरीप हंगामात १६३.१५ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर खरिपात विक्रमी धान्य उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी म्हटले आहे.

वार्षिक खरीप परिषदेत केंद्रीय मंत्री तोमर बोलत होते. या खरिप हंगामात केंद्र सरकारने ११२ टन तांदूळ (Rice), ४०.६० दशलक्ष टन तृणधान्य (Cereals) , १०.५५ दशलक्ष टन कडधान्य (Pulses) उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. याखेरीज २६.८९ दशलक्ष टन तेलबिया (Oil Seeds) उत्पादनाचा सरकारचा अंदाज आहे.

Kharip Sowing
ड्रोन फवारणीसाठी ४७७ कीडनाशकांना केंद्रांची मंजुरी

२०२१-२०२२ च्या खरिपात केंद्र सरकारने १५०.५८ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात गेल्या खरिपात १५३.५४ दशलक्ष टन धान्य उत्पादन घेतले होते. यंदा सरकारला गेल्या खरीपातील उत्पादनापेक्षा १३ दशलक्ष टन अधिक उत्पादनाची अपेक्षा आहे.

यंदाच्या खरिपात केंद्र सरकारकडून तांदळाच्या जुन्या वाणांऐवजी नव्या वाणांचा वापर अपेक्षित आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तांदळाच्या या नव्या वाणांच्या वापरामुळे उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Kharip Sowing
तेलंगणातल्या तांदूळ उत्पादकांना अखेर दिलासा!

या खरिपासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना तेलबिया (Oil Seeds) लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे आवाहन केले आहे. कर्नाटकातील तेलबिया लागवडीचे क्षेत्र सातत्याने घटत चालले आहे. २०२०-२०२१ मध्ये कर्नाटकातील तेलबिया लागवडीचे (Oil Seeds) क्षेत्र २. २६ लाख हेक्टर होते. १९९३-१९९४ मध्ये कर्नाटकात २६.६८ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आली होती.

खाद्यतेलाची (Edible Oil) देशांतर्गत मागणी व उत्पादनातील तफावत भरून काढायची असेल तर देशातल्या विविध राज्यात तेलबिया लागवडीचे प्रमाण वाढायला हवे, असे तोमर म्हणाले आहेत.

देशाच्या कृषी उत्पादनात वाढ झाल्याने आपल्या कृषी मालाची निर्यातही वाढली आहे. जागतिक बाजारातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर भर देण्याची गरज असल्याचेही तोमर म्हणाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com