Test soil health in just 90 seconds, courtesy IIT Kanpur | Agrowon

अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण; आयआयटी कानपूरचं संशोधन

टीम ॲग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आता मातीचे परिक्षण करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.

वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने एक नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे आता मातीचे परिक्षण (Soil Test) करण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. आयआयटी कानपूरने (IIT Kanpur) एक पोर्टेबल माती परिक्षण उपकरण (Portable Soil Testing Device) विकसित केले आहे. जे एम्बेडेड मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे केवळ ९० सेकंदात मातीच्या आरोग्याची माहिती शोधू शकते. मातीच्या गुणवत्ता तपासण्यासाठी या उपकरणामध्ये नमुना म्हणून फक्त पाच ग्रॅम माती वापरावी लागते.

९० सेकंदात सॉईल हेल्थ अहवाल -

या पोर्टेबल यंत्राद्वारे माती परिक्षणासाठी भू- परिक्षकामध्ये (Bhu Parkshak) नमुन्याच्या स्वरुपात ५ ग्रॅम वाळलेल्या मातीची आवश्यकता असते. पाच सेंटींमीटर लांबीच्या दंडगोलाकार उपकरणामध्ये माती घातल्यानंतर हे उपकरण स्लत: ब्लू टूथद्वारे मोबाईलला जोडते. आणि ९० सेकंदात मातीचे विश्लेषण करण्यास सुरूवात करते. विश्लेषणानंतर चाचणीचे परिणाम जमिनीच्या आरोग्य अहवालाच्या स्वरूपात स्क्रीनवर दाखवते, असे केमिकल इंजिनिअरींग विभागाचे प्राध्यापक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले आहे.  

हेही वाचा - सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' गाडीचा आविष्कार 

उपकरणाची वैशिष्टे -
 
हे उपकरण मातीतील नायट्रोजन (Nitrogen), फॉस्फरस, पोटॅशिअम (Potassium), ऑर्गॅनिक कार्बन (Organic Carbon), क्ले कंटेट (Clay Content) आणि कॅटायन विनिमयाची क्षमता प्रमुख घटकांचे परिक्षण करते. याशिवाय शेत आणि पिकांसाठी लागणाऱ्या आवश्यक खतांच्या मात्रेचीही शिफारस करते. ॲपमध्ये प्रादेशिक भाषांचा वापर केला गेला असल्याने ते हाताळायला सोपे आहे. इतके की आठवीपर्यंत शिक्षण झालेला व्यक्तीही हे उपकरण आणि ॲप वापरू शकेल. हे उपकरण १ लाख माती चाचणी नमुने तपासू शकते.
 
प्ले स्टोरवर ॲप उपलब्ध -

अशा प्रकारचा हा पहिला आविष्कार असून, इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानावर (Infrared Spectroscopy Technology) आधारित आहे, जो स्मार्टफोनवर माती परिक्षणाचा अहवाल देतो. भू-परिक्षक नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे, असे आयआयटी कानपूरने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय पिकांच्या कलमीकरणाचे नवे तंत्र

शेतकऱ्यांना होणार फायदा -

आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या मते, आयआयटीने विकसित केलेल्या माती परिक्षण उपकरणामुळे शेतकऱ्यांना खूप मदत होणार आहे. देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यापैकीच एक समस्या म्हणजे माती परिक्षण करून त्याच्या अहवालाची प्रतिक्षा करणे. मात्र, या उपकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचून त्यांचा फायदा होणार आहे.

व्हिडीओ पाहा -  

दरम्यान, या उपकरणाच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या उद्देशाने याचे तंत्रज्ञान अॅग्रोनेक्स्ट (Agronxt) कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या संदर्भात ११ डिसेंबर २०२१ रोजी आयआयटी कानपूर आणि अॅग्रोनेक्स्ट सर्व्हिसेस यांच्यात तंत्रज्ञान परवाना करार झाला आहे.


इतर टेक्नोवन
पेरणी, पुनर्लागवडीसाठी आधुनिक कृषी...मनुष्यचलित भात बी पेरणी यंत्र या...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
अवघ्या ९० सेंकदात होणार माती परिक्षण;...वृत्तसेवा - मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी...
सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'...सांगली - देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार...
केंब्रिज विद्यापीठात शोधले गवतवर्गीय...एका वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पतींचे कलम केले....
चावा घेणाऱ्या माश्यांना आकर्षित करणारे ...पशुपालनामध्ये चावा घेणाऱ्या आणि रक्त शोषणाऱ्या...
यांत्रिकीकरणातून शेती केली सुलभ,...परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथील ओंकारनाथ शिंदे...
गावातील पाईपलाईन गळतीची समस्या सुटणार;...औरंगाबाद - ग्रामीण भागातील घरांना पाणी पुरवठा...
आता स्वतःच करा माती परीक्षण !कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी)...
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण...निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही...
नव्या गहू जातीने पेलला क्षार, पाणथळ...पंजाबच्या नैर्ऋत्येकडील भागामध्ये जमिनी क्षारपड...
एकाच मूळ वनस्पतीचे गुणधर्म नेता येतील...कॅलिफोर्निया डेव्हिस विद्यापीठातील...
नव्या हरभरा जाती विकसनासाठी कृत्रिम...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट हरभऱ्याचे सर्वोत्तम...
हाडावर वाढवता येईल संगणक!हाडावर अतिपातळ वायरलेस इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार...
एकात्मिक शेती पद्धतीतून आदिवासी महिलेने...एकाच प्रकारच्या शेतीवर अवलंबून राहिल्यास आर्थिक...
पारदर्शक फोन : नव्या आभासी क्रांतीच्या...दर काही दिवसाने मोबाईल फोनमध्ये बदल होत असल्याचे...
‘कल्चर्ड’ मांसामध्येच मिळेल मेदाचा स्वादप्रयोगशाळेत पेशींपासून वाढवलेल्या मांसाला...
वेळ, मजुरी, कष्टात बचत करणारी यंत्रे;...राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘...
दूध प्रक्रिया उद्योगातील उपकरणेदूध हा नाशीवंत पदार्थ असल्यामुळे उत्पादित आणि...