कांदा, हरभऱ्याच्या किमतींत उतार

फेब्रुवारी महिन्यात मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हळद व टोमॅटो यांच्या किमतींत उतरता कल होता. २२ फेब्रुवारी नंतर कांद्याच्या किमतीसुद्धा उतरू लागल्या आहेत.
there is decrase in prices of onion and bengal gram
there is decrase in prices of onion and bengal gram

फ्युचर्स किमतीः सप्ताह- ११ ते १८ मार्च, २०२२ फेब्रुवारी महिन्यात मका, हरभरा, मूग, सोयाबीन, तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या. कापूस, हळद व टोमॅटो यांच्या किमतींत उतरता कल होता. २२ फेब्रुवारी नंतर कांद्याच्या किमतीसुद्धा उतरू लागल्या आहेत. मार्च महिन्यातील गेल्या तीन सप्ताहांत कापूस, कपाशी, मका व मूग यांच्या किमती वाढत आहेत. मक्याचे उत्पादन जरी वाढत असले तरी निर्यात मागणीसुद्धा वाढत आहे. या उलट हळद, हरभरा, तूर व कांदा यांच्या किमती उतरत आहेत. गेल्या तीन सप्ताहात कापूस, मका, मूग, सोयाबीन व तूर यांची आवक कमी होत आहे तर हळद, हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक वाढत आहे. हेही पाहा -Soybean, Maize Price: पोल्ट्री उद्योगाचा आधार गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात कापूस, कपाशी, तूर व टोमॅटो यांच्या किमती वाढल्या तर मका, हरभरा, सोयाबीन व कांदा यांच्या किमती उतरल्या. कांद्यातील घसरणीवर लक्ष ठेवणे जरूर आहे. पुढील काही महिने आवक वाढणार आहे.   किमतींतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत. कापूस/कपाशी (Cotton) MCX मधील कापसाचे व कपाशीचे  राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) फेब्रुवारी महिन्यात कमी होत होते. या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव १.९ टक्क्यांनी वाढून रु. ३८,०६० वर आले आहेत. एप्रिल डिलिवरी भाव १.१ टक्क्याने वाढून रु. ३९,३०० वर आले आहेत. कपाशीचे एप्रिल डिलिवरी भाव २.९ टक्क्यांनी वाढून रु २,०२० वर आले आहेत. हेही वाचा- मढी यात्रेला सुरुवात मका (Maize) मक्याच्या स्पॉट (छिंदवाडा) किमती फेब्रुवारी महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.१  टक्क्यांनी घसरून रु. २,२२५ वर आल्या आहेत.  फ्युचर्स (एप्रिल डिलिवरी) किमती मात्र या सप्ताहात ७ टक्क्यांनी वाढून रु. २,२३४ वर आल्या  आहेत. जून फ्युचर्स किमती रु. २,००८ वर आल्या आहेत. त्या स्पॉट किमतींपेक्षा ९.८ टक्क्यांनी कमी आहेत. मक्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. १,८७० आहे. मक्याची मागणी वाढती राहणार आहे.  पण रबी मक्याची आवकसुद्धा गेल्या सप्ताहापासून सुरु झाली आहे. हळद (Turmeric) हळदीच्या स्पॉट (निझामाबाद) किमती फेब्रुवारी  महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या १.४ टक्क्यांनी घसरून  रु. ८,८२० वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती रु. ८,६५८ वर आल्या आहेत.  हळदीची आवक वाढत आहे. हेही पाहा- ग्रामस्थांच्या आक्रमकतेमुळे १३ दिवसांनंतर वीजपुरवठा सुरू हरभरा (Bengal Gram) हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर)किमती फेब्रुवारी मध्ये घसरत होत्या. या सप्ताहात त्या २.५ टक्क्यांनी घसरून रु. ४,८७९ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,२३० आहे. आवक वाढत आहे. मूग (Green Gram) मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ७,३०० होती; या सप्ताहात ती ७,३०० वरच स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,२७५ आहे.  आवक आता कमी होत आहे. सोयाबीन (Soybean) सोयाबीनची स्पॉट किमत (इंदूर) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात साप्ताहिक सरासरी किमत ४  टक्क्यांनी वाढून रु. ७,८६५ वर आली होती. या सप्ताहात ती २.३ टक्क्यांनी घसरून  रु. ७,६८१ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ३,९५० आहे. तूर (Tur) तुरीची स्पॉट किमत (अकोला) फेब्रुवारी महिन्यात वाढत होती. गेल्या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी वाढून  रु. ६,१२५ वर आली होती. या सप्ताहात ती  पुन्हा ०.४ टक्क्यांनी वाढून  रु. ६,१५० वर आली आहे.  तुरीचा हमीभाव रु. ६,३०० आहे.  तुरीची आवक कमी होऊ लागली आहे. किमती वाढत्या राहतील. कांदा (Onion) कांद्याची स्पॉट किंमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात  रु. १,३७२ होती; या सप्ताहात ती पुन्हा १६.५ टक्क्यांनी घसरून रु. १,१४६ वर आली आहे. या सप्ताहात कांद्याची आवक वाढलेली आहे. यापुढे रब्बी कांद्याची आवक वाढती राहील. पिंपळगावमध्ये कांद्याची किमत २२ फेब्रुवारी नंतर घसरत आहे.  कांद्याच्या किमतीवर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. टोमॅटो (Tomato) टोमॅटोची स्पॉट किंमत (पिंपळगाव/नाशिक) गेल्या सप्ताहात रु. ६८७  होती; या सप्ताहात ती  वाढून  रु. १,००० वर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com