सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरू

सांगली जिल्ह्यात ७१८ सौर कृषिपंपाचे उद्दिष्टे असून, ६३१ शेतकऱ्यांना अंदाजपत्रके दिली आहेत. सद्यःस्थितीत ४०९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा रक्कम भरली आहे. त्यापैकी ३९९ सौर पंप बसवण्याचे आदेश दिले असून, ३०३ पंप बसवले आहेत.
सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरू Three hundred solar agricultural pumps started in Sangli
सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरू Three hundred solar agricultural pumps started in Sangli

सांगली  : वीजपुरवठा नसतानाही दिवसा पिकांना गरजेवेळी पाणी देता यावे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना महावितरणमार्फत राबविण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात ७१८  सौर कृषिपंपाचे उद्दिष्टे असून, ६३१ शेतकऱ्यांना अंदाजपत्रके दिली आहेत. सद्यःस्थितीत ४०९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा रक्कम भरली आहे. त्यापैकी ३९९ सौर पंप बसवण्याचे आदेश दिले असून, ३०३ पंप बसवले आहेत.  अनेक भागात शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध नसल्यामुळे पिकांना दिवसा पाणी देता येत नाही. बऱ्याचदा पाण्याअभावी पिके जळून जातात. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अमलात आणली. शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटून सिंचन वेळेत करता यावे हा योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागात वीज खंडित झाल्यानंतर बरेच शेतकरी डिझेल पंप बसवतात. परंतु इंधनाचा खर्च अधिक आहे. त्यामुळे डिझेल पंपाऐवजी सौर पंप योजनेतून दिले जात आहेत. पाच एकरांपर्यंत जमीनधारकास तीन अश्‍वशक्ती क्षमतेचा आणि त्यापुढील क्षेत्र धारण करणाऱ्यास पाच अश्‍वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप दिला जातो. त्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याकडून दहा टक्के व अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांकडून पाच टक्के हिस्सा रक्कम भरणे आवश्‍यक आहे. शेतीला दिवसाच्या वेळी सिंचन करणे शक्‍य व्हावे या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महावितरणमार्फत राबवली जाते. सांगली जिल्ह्यात सध्या तीन अश्वशक्तीचे २६७ तर पाच अश्वशक्तीचे ३६ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ६३१ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी अंदाजपत्रके दिली आहेत. त्यापैकी ४०९ शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्सा रक्कम भरणा केली आहे. शेतकऱ्यांनी निवडलेल्या पुरवठाधारक एजन्सीला सौरकृषी पंप बसवण्याचे कार्यादेश दिले आहेत. सध्या कार्यादेश दिलेल्या ३९९ पैकी ३०३ पंप बसवले आहेत. उर्वरित कामे देखील सुरू आहेत.

सौर कृषिपंपाचे फायदे-

  • दिवसा कृषिपंपास अखंडित वीजपुरवठा होणार
  • वीजबिलापासून मुक्तता मिळणार
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचालन खर्च
  • पर्यावरणपूरक, अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढणार  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com