Top 5 News: विदर्भात कापसाच्या आवकेची अशी आहे सद्यःस्थिती

विदर्भात कापसाची आवक मंदावली असून कापूस उत्पादकांना दरवाढीची अपेक्षा आहे. काय आहे सध्याची परिस्थिती, वाचा सविस्तर...
cotton arrivals
cotton arrivals

1. राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय. तर उत्तर महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये गारठा कमी (rise in temperature) झालाय. सोमवारी निफाडच्या गहू संशोधन केंद्रात पारा 5.5 अंश सेल्सिअसवर होता. तर सोलापूरला उच्चांकी 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका आणखी वाढणार असून, थंडी कमी होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलीय.

Daily Weather Video (Hindi) Dated 07.02.2022 Facebook Link: https://t.co/6xR3DzmS31 You Tube Link: https://t.co/t6niILbKWl

— India Meteorological Department (@Indiametdept)

2. राज्यात डाळिंबाच्या (pomegranate) एकूण क्षेत्रापैकी 20 टक्के क्षेत्रावर हस्त बहर धरला जातो. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांनी हा बहर धरलाय. मात्र बहर धरल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सूनोत्तर पावसानं (post-monsoon rainfall) हजेरी लावली. त्याचा परिणाम बहरावर झालाय. बागांना व्यवस्थित ताण बसला नाही. त्यामुळे कळी निघण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. काही भागांत कळी निघूनही सेट होऊ शकली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात पिकाला पोषक वातावरण तयार झालं होतं. पण आठ दिवसांपासून थंडी पुन्हा वाढली असल्यानं वातावरणात बदल झाला. यामुळे फुलांचं सेटिंग होण्याची समस्या वाढलीय. अशा नैसर्गिक आपत्तींमुळे 25 हजार हेक्टरवरच्या बांगांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाच्या सूत्रांनी व्यक्त केलाय.

3. राज्याचा ऊस गाळप हंगाम (sugar season) आता 748 लाख टनांच्या पुढे जात आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. अजून 300 लाख टनांपेक्षा जास्त गाळप करून यंदाचा हंगाम आधीचे सर्व विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. चार फेब्रुवारीपर्यंत राज्यात 197 साखर कारखान्यांनी (sugar factories) शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसापैकी 748.85 लाख टन ऊस गाळला होता. यात 98 सहकारी तर 99 खाजगी कारखान्यांचा सहभाग आहे. या दोन्ही गटातल्या कारखान्यांनी आतापर्यंत 755.16 लाख क्विंटल साखर तयार केलीय. तर राज्याचा साखर उतारा 10.08 टक्के इतका येतोय.

4. पंतप्रधान गरिब कल्याण योजनेच्या (PMGKY) पाचव्या टप्प्यात केंद्राकडून 50 लाख टन अन्नधान्याचं वितरण गरजू नागरिकांना झाल्याचं सरकारनं (central government) म्हटलंय. देशातल्या 80 कोटी नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचं (National Food Security Act) सरंक्षण प्राप्त आहे. या नागरिकांना त्यांच्या महिनेवार शिधेच्या वर 5 किलो प्रति व्यक्ती मोफत अन्नधान्य मिळण्याची सोय गरिब कल्याण योजनेत केली गेलीय. कोरोनाच्या संकटकाळात गरजूंची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती.

हा व्हिडिओ पाहिलात का? :   5. कापसाचं घटलेलं उत्पादन, भावपातळीची घोडदौड, अन् येत्या काळात दरवाढीची अपेक्षा - अशा कारणांमुळे वर्धा बाजारासहित परिसरातल्या बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक (cotton market arrivals) कमी आहे. तर दुसरीकडे देऊळगाव राजा आणि खामगाव बाजारातही कापसाची आवक गेल्या आठवड्यापासून स्थिर आहे. इतर महत्त्वाच्या बाजारांमध्येही (APMC) आवकेत कोणतीही मोठी वाढ दिसत नाही. जानेवारी महिना संपून आठवडा लोटला तरी बाजारात कापसाची नगण्य आवक आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्याच्या सात बाजार समितीत फक्त 13,47,500 क्विंटल कापसाची खरेदी झाल्याचं दिसतंय. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे (bollworm) यंदा कपाशीचं उत्पादन कमी झालंय. यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही (international markets) कपाशीच्या उत्पादनात मोठी घट आहे. त्यामुळे बाजारात कापसाच्या भावात सध्या तेजी पाहायला मिळतीय. तेजीमुळे कपाशीनं यंदा दहा हजारांचा आकडा पार केला. दहा हजार दर असताना अनेक शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला. त्यानंतर मात्र दरांमध्ये करेक्शन आलं होतं, म्हणजेच दर काहीसे घसरले होते. घसरलेले दर वाढतील या अपेक्षेत शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विक्रीला (cotton sales) ब्रेक दिला. यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरीच ठेवल्याचं पुढे येतंय. काही मोठ्या शेतकऱ्यांनी फक्त निम्माच कापूस बाजारात आणलाय. त्यांचा बराच कापूस राखून ठेवला असल्याचं बाजारातल्या सुत्रांचं म्हणणं आहे. सध्या शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत असल्यानं हा कापूस बाजारात कधी येईल, या बाबत सांगणं कठीण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com