Top 5 News: हरभरा पेरणीत आता महाराष्ट्र देशात अव्वल!

यंदाच्या रब्बीच्या सुरुवातीला देशपातळीवर लावल्या गेलेल्या अंदाजांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिलीये. त्याही पुढे जात आता देशात महाराष्ट्रात हरभऱ्याचं सर्वात जास्त क्षेत्र तयार झाले आहे.
हरभरा
हरभरा

1. उत्तर महाराष्ट्रात सध्या सकाळी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. शेजारच्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधल्या थंडीच्या लाटेचा विपरित परिणाम उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा आणि द्राक्ष पिकांवर होताना दिसतोय. त्यात आता 22 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्र, पुणे, आणि कोकणात 22 जानेवारीला पावसाचा अंदाज असल्याचे मुंबई वेधशाळेने दिलाय. तसंच 23 तारखेला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तोवर थंडी कमीच राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. सध्या राज्यात किमान तापमानात चढ उतार सुरू असून कमाल तापमानात मात्र वाढ झाली आहे.

2. गेल्या तीन महिन्यांत देशातून सुमारे 17 लाख टन साखरेची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ही साखर निर्यात झाली. विविध बंदर आणि बाजारपेठेतून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीअखेर आणखी 7 लाख टन साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 4.5 लाख टन साखर निर्यात झाली होती. गेल्या एक महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी झाल्याने निर्यातीचे नवीन करार मंदावलेत.

3. सध्या देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका आहे. त्यामुळे देशभरात गरजूंपर्यंत अन्नधान्य पुरवण्याला रेल्वेने प्राधान्य दिले. त्यानंतर खते आणि कोळशाच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. परिणामी, शेतमालाच्या निर्यातीसाठी रेल्वेचे डबे अर्थात रेक उपलब्ध होत नाहीत. हा प्रश्न सोडवण्यासाठी अपेडाने पुढाकार घेतला असून रेल्वे मंत्रालयाशी अपेडा सतत संपर्कात असल्याचे बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. तर साखर आणि तांदळाचे निर्यातदार रस्तेमार्गे आपला माल बंदरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतायत. रेकच्या कमतरतेचा मुद्दा अजून काही काळ लांबण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. परिणामी, नाशवंत मालाच्या निर्यातीला अडचणी येतात.

4. खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनाही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसतोय. शनिवारी 8 आणि रविवारी 9 तारखेला अमरावती विभागातल्या अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस, गारपीट झाली. परिणामी, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 15,827 हेक्‍टरवरच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आलाय.

व्हिडीओ पाहा - 

5. यंदाच्या रब्बीच्या सुरुवातीला देशपातळीवर लावल्या गेलेल्या अंदाजांना बाजूला सारत शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिलीये. त्याही पुढे जात आता देशात महाराष्ट्रात हरभऱ्याचं सर्वात जास्त क्षेत्र तयार झाले आहे. देशात हरभऱ्याचे सहसा मध्य प्रदेशात सर्वात जास्त क्षेत्र असते, पण मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात मजबूत अशी क्षेत्रवाढ झाल्याने राज्याने आघाडी घेतली आहे. रब्बीच्या सुरुवातीला देशात हरभऱ्याकडून लोक मोहरीकडे वळतील. परिणामी मोहरीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज होता. तसे झालेही. पण हरभऱ्याला धक्का न लागता गव्हाखालचे क्षेत्र मोहरीकडे वळते झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार 2016-17 च्या तुलनेत 2021-22 मध्ये हरभऱ्याच्या क्षेत्रात 547 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सहा वर्षात हरभऱ्याचा पेरा सहापट वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राखेरिज, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, आणि उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये हरभरा क्षेत्र वाढले आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, आणि राजस्थानात हरभऱ्याचा पेरा घटलाय. एकट्या महाराष्ट्रात हरभऱ्याची 25.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीचे क्षेत्र बघता ही 9.2 टक्के एवढी जबरदस्त वाढ ठरते. येत्या एक ते दिड महिन्यात हरभऱ्याची आवक चालू होईल. तेव्हा या नवीन मालाला भाव किती मिळतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com