Top5 news-तूर बाजारात सुधारणा होईल का

तुरीची काढणी जवळपास पूर्ण झाली. मात्र विक्रमी आयातीमुळे तूर दर दबावात आहेत. तरीही राज्यातील शेतकरी हमीभावाने नाफेडला तूर विकत नाहीत. यामागचे कारण काय आहे?
Tur Bazaar
Tur Bazaar

कमाल तापमान चाळीशी पार पोचल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारपासून विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. उद्यापासून विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे. विदर्भापासून, मराठवाडा, दक्षिण कर्नाटक पर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडीत झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान आहे.

हेही पाहा- Fertilizer Shortage नसल्याचा कृषी विभागाचा दावा 

2. सरकराने यंदा हरभऱ्याला ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र बाजारातील दर ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावाने हरभार विक्रीला पसंती देत आहेत. देशात आत्तापर्यंत हमीभावाने २ लाख १० हजार टन हरभरा खरेदी झाली. हमीभावाने खरेदीत गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत १ लाख १० हजार टन खेरदी झाली. तर महाराष्ट्रात ८६ हजार टन हरभरा शेतकऱ्यांनकडून खरेदी झाला. तसेच कर्नाटकातील खरेदी २० हजार टनांवर पोचली. बाजारात दर कमी असल्याने यंदा नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. 

3. पिकांच्या उन्हाळी लागवड क्षेत्रात यंदा ७.५ टक्क्यांनी वाढ झाली. गेल्यावर्षी ४४ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होती. यंदा आत्तापर्यंत ४७ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिके आहेत. यंदा कडधान्याचं क्षेत्रं वाढलंय. गेल्या वर्षीच्या सव्वापाच लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ७ लाख ४८ हजार हेक्टरवर कडधान्य लागवड झाली. त्यातही मूग आणि उडीद लागवडीत प्रमाण वाढलंय. ओडीशातील कडधान्य लागवडीनं २.४६ लाख हेक्टरचा पल्ला गाठलाय, तर तामिळनाडूत १. ७६ लाख हेक्टरवर कडधान्य लागवड करण्यात आलीय. 4. चालू हंगामात कापसाला चांगला दर मिळतोय. कोरोनानंतर घटलेले उत्पादन आणि वाढलेला वापर, यामुळे टंचाई भासतेय. यंदा निर्यातीसाठी मागणीही अधिक आहे. परिणामी पुढील हंगामासाठीचा साठाही कमी राहिला. त्यामुळे येणाऱ्या खरिपात कापसाची लागवड वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. हरियानातही कापसाची लागवड २०२२-२३ मध्ये ३ लाख ३५ हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात हरियानात १५ लाख ९० हजार हेक्टरवर कापूस होता. पुढील हंगामात १९ लाख २५ हजार हेक्टर कापसाखाली येण्याची शक्यता आहे. हरियानात मुख्यतः भात आणि गव्हाचे उत्पादन होते. मात्र येथील सरकार या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी करण्याचे प्रयत्न करत आहे.   

5. देशात तुरीची काढणी जवळपास पूर्ण झाली. मात्र सध्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर मागे ठेवली. नाफेडने महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांत खरेदी सुरु केली. मात्र या खरेदीलाही कमी प्रतिसाद मिळतोय. देशात आत्तापर्यंत केवळ १८ हजार ८६१ टन तुरीची खरेदी झाली. त्यातुलनेत हरभरा खरेदी जोमात सुरुये. यंदा जवळपास ८ लाख टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली. कोरोनाकाळात नाफेडने मोठा तुरीचा साठा बाहेर काढला. परिणामी तुरीच्या दरावर परिणाम झाला. सध्या बाजारात तुरीला ५ हजार ४०० ते ६ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. सर्वसाधारण दर ६ हजार रुपये आहे. खुल्या बाजारात दर कमी असूनही नाफेडच्या खरेदीलाही प्रतिसाद मिळत नाहीये. महत्वाच्या महाराष्ट्रात तर आत्तापर्यंत केवळ १ हजार ७१३ टन खरेदी झाली. सर्वाधिक खरेदीन नाफेडने कर्नाटकात केली. येथील शेतकऱ्यांनी १२ हजार ७४० टन तूर नाफेडला विकली. त्यानंतर गुजरातचा नंबर लागतो. येथे ४ हजार ३७४ टन तूर नाफेडच्या खरेदीवर आला. तमिळनाडूत सर्वांत कमी खरेदी झाली. पुढील काळात दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे नाफेडलाही शेतकरी तूर विकताना दिसत नाहीत, असे जाणकारांनी सांगितले. यंदाच्या हंगामात तुरीला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळू शकतो, अशी शक्यताही जाणकारांनी व्यक्त केली. तर सर्वसाधारण दर हमीभावाऐवढे राहू शकतात, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com