त्रिवेणी इंजि. प्रति दिवस करणार ५४० किलोलीटर इथेनॉल उत्पादन

देशातील दुसरी सर्वात मोठी साखर उत्पादक त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज पुढील महिन्यात त्यांचे दोन नवे इथेनॉल प्रकल्प सुरू करणार आहे. ज्यामुळे कंपनीची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता सध्याच्या ३२० किलोलीटर प्रति दिवसावरून (केएलपीडी) ५४० केएलपीडीवर जाणार आहे.
Ethanol Production
Ethanol Production

देशातील दुसरी सर्वात मोठी साखर उत्पादक त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज (Triveni Engineering & Industries Ltd) पुढील महिन्यात त्यांचे दोन नवे इथेनॉल प्रकल्प (Ethanol Plant) सुरू करणार आहे. ज्यामुळे कंपनीची एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता (Capacity Of Ethanol Production) सध्याच्या ३२० किलोलीटर प्रति दिवसावरून (केएलपीडी) (Kilo Litter Per Day) ५४० केएलपीडीवर जाणार आहे. याशिवाय पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी इथेनॉल उत्पादन (Ethanol Production) ६६० केएलपीडीपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हिंदू बिझनेस लाईनने ही बातमी दिली आहे. 

दिवसाकाठी १६० किलोलीटर प्रति दिवस क्षमतेच्या साखरेपासूनच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाशिवाय कंपनी मुझफ्फरनगर येथील आसवनी प्रकल्पातूनही दिवसाला ६० किलोलीटर इथेनॉलची निर्मिती करते.  १६० केएलपीडी क्षमतेच्या मिलक नारायणपूर युनिटमध्ये ऊस आणि धान्यापासून इथेनॉल निर्मितीची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरूण साहनी यांनी दिली आहे.  

इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम (Ethanol Blending Programme) आणि निर्यात कोटा धोरणामुळे सध्या साखर उद्योग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. इथेनॉलच्या या दोन धोरणात्मक निर्याशिवाय हे शक्य नव्हते. कंपनीने २०२०-२१ (नोव्हेंबर-डिसेंबर) हंगामात ९.१४ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याची (Ethanol Supply) ऑर्डर मिळवली होती. जी कंपनीने पूर्ण केली. यावर्षी कंपनी ८.७२ कोटी लिटरचा पुरवठा करणार आहे. तेल विपणन कंपन्यांनी २०२०-२१ मध्ये देशभरातून ३ अब्ज लिटरहून अधिक इथेनॉलची खरेदी केली आहे. तर इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण ८.१ टक्क्यांवर गेले आहे.

साखरेच्या परिस्थितीबाबत बोलताना साहनी म्हणाले की, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासाठी असणाऱ्या दबावामुळे साखर क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. कोटा पद्धतीमुळे साखर उद्योगाला चालना मिळाली आहे.  तसेच गेल्या काही वर्षांत कारखान्यांच्या नफ्यातही वाढ झाली आहे. याशिवाय, निर्यात प्रोत्साहन होते आणि सरकारने या हंगामात कारखान्यांना त्यांच्या निर्यात कामगिरीच्या आधारे देशांतर्गत कोटा रिलीझमध्ये लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com