पिवळी डेझी लागवड कशी करावी?

पिवळी डेझी लागवड कशी करावी?
पिवळी डेझी

पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे. या वनस्पतीचा वापर प्रामुख्याने ''फिलर मटेरिअल'' म्हणून करण्यात येतो. या फुलाला सॉलिडॅगो, गोल्डन रॉड, सोनतुरा असेही म्हणतात.

  • लागवडीसाठी मध्यम किंवा हलक्‍या प्रकारातील उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. मशागतीनंतर हेक्‍टरी १५ टन कुजलेले शेणखत मिसळावे. त्यानंतर तीन मीटर लांब आणि दोन मीटर रुंद सपाट वाफे तयार करावेत किंवा सरी वरंब्यावरदेखील लागवड करता येते. याची अभिवृद्धी सहजगत्या रोपाच्या कडेला फुटणाऱ्या फुटव्यांद्वारा करण्यात येते. फुटव्यांची लागवड ३० x ३० सें.मी. किंवा ५० x ५० सें.मी. अंतरावर करावी. सरी वरंब्यावर लागवड करताना ४५ ते ५० सें.मी. अंतर ठेवून रोपांतील अंतर ३० सें.मी.पर्यंत ठेवावे. शक्‍यतो संध्याकाळी मुनवे लावावेत. फुलदांडा उंच वाढल्यानंतर प्रत्येक रोपाभोवती एक किंवा दोन मुनवे राखावेत.
  • रोपांच्या जोमदार वाढीसाठी माती परीक्षणानुसार दर वर्षी हेक्‍टरी ८० किलो नत्र, ८० किलो स्फुरद आणि ८० किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून लागवडीनंतर चार महिन्यांच्या अंतराने द्यावी.
  • लागवडीनंतर ४० ते ५० दिवसांनी फुले येण्यास सुरवात होते.
  • संपर्क :०२० - २५६९३७५० राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प,गणेश खिंड, पुणे

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com