Tur Market News : अमरावतीत वाढली तुरीची आवक

Tur Market Update : आज अमरावती बाजार समतीत तुरीची ८ हजार ३७९ क्विंटल आवक झाली होती. या वेळी तुरीला किमान ५ हजार ७५० रुपये तर कमाल ६ हजार ७५० रुपये दर मिळाला.
tur
tur

पुणे : राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांतील तुरीचे (Tur) आणि कांद्याचे (Onion) डेली रेट पाहणार आहोत. आज अमरावती बाजार समतीत तुरीची ८ हजार ३७९ क्विंटल आवक झाली होती. या वेळी तुरीला किमान ५ हजार ७५० रुपये तर कमाल ६ हजार ७५० रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ६ हजार २५० रुपयांवर होता. हिंगोली बाजार समितीत किमान ६ हजार तर कमाल ६ हजार ६५५ रुपये आणि सर्वसाधारण ६ हजार ३२७ रुपये दर मिळाला.

तर सोलापूर बाजार समितीत सर्वसाधारण दर ५ हजार ९४० रुपयांवर होता. किमान दर ५ हजार ५० रुपये तर कमाल दर ६ हजार ३० रुपये मिळाला.

आता राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांतील कांद्याचे दर पाहू.

आज सोलापूर बाजार समितीत कांद्याची ४२ हजार ५०९ क्विंटल आवक झाली होती. या वेळी लाल कांद्याला किमान १०० रुपये, तर कमाल ३ हजार ६२५ रुपये आणि सर्वसाधारण १ हजार ८०० रुपये दर मिळाला. लासलगाव बाजारात सर्वसाधारण दर २ हजार ३०० रुपये होता. किमान १००० रुपये तर कमाल दर २ हजार ७८० रुपयांवर होता. येवला बाजारात किमान ५०० रुपये तर कमाल २ हजार ५९१ रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण दर २ हजार २०० रुपयांवर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com