Subabhul In Goat Diet
Subabhul In Goat Diet

शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा

सुबाभूळ हे विविधोपयोगी द्विदल जातीचे चारा पिक आहे. सुबाभूळ हे सर्व शेळ्यांसाठी उपयुक्त असं चारापीक आहे. सुबाभूळ कमी पाण्याच्या प्रदेशातही तग धरून चारा उत्पादन देते. यापासून मिळणाऱ्या चाऱ्यामध्ये जवळजवळ २०-२२ टक्के प्रथिने, ८.४ टक्के खनिजे असतात.

शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यातील मायमोसीन नावाच्या द्रवामुळे शेळ्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. सुबाभळीच्या हिरव्या शेंगा लुसलुसीत व मऊ असतात. बियांचा वापर शेळ्यांच्या खुराकात होऊ शकतो.

सुबाभळीची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते. विशेष म्हणजे खार जमिनीवर देखील चारा पिकांची लागवड करता येते.चांगल्या उत्पादनासाठी उत्तम निचरा होणारी, स्फुरद असणारी जमीन लागवडीसाठी फायद्याची असते. लागवडीसाठी हेक्टरी ५ ते ८ किलो बियाणे लागते. तर ३००००० ते ४००००० रोपे लागतात. सुबाभळीचे बी हे सामाजिक वनीकरण विभागामार्फत रास्त भावाने मिळत असते.

आपण सुबाभळीची लागवड कोणत्याही हंगामात करू शकतो. दोन ओळीतील अंतर १ मीटर तर झाडांमधील अंतर २० ते ३० सेंटीमीटर इतके असावी. सुबाभूळ बियाणावरील कवच कठीण असल्यान बियाणे उशिरा उगवते. यासाठी पेरणीपूर्वी बियाणे उकळलेल्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे ठेवून नंतर ओल्या कापडात किंवा गोणपाटात गुंडाळून ठेवावे म्हणजे रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होईल.

कमी पाण्यावर चांगल तग धरून राहते. खत पुरवठ्यामुळे मुळांची वाढ उत्तम होऊन उत्पादनात वाढ होते. सर्वसाधारण पिक दीड ते दोन मीटर वाढले असता पहिली कापणी जमिनीपासून ६० सेंटीमीटर उंचीवर करावी. लागवडीनंतर ६ महिन्यात पहिली कापणी करता येते. चांगल्या पूर्ण वाढ झालेल्या पिकापासून हेक्टरी साधारणतः ५० तर ६० टन वैरणीचे उत्पन्न मिळते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com