उत्तर प्रदेशात निवडणुकीचा अखेरचा टप्पा पूर्ण 

वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघासह आझमगढ, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, भडोही, सोनभद्र आणि मिर्झापूर या जिल्ह्यांतील एकूण ५४ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यांसह किती जागा भाजपला मिळणार ? अशी उत्सुकता आहे.याशिवाय योगी सरकारमधील ७ मंत्र्याची प्रतिष्ठा लागली आहे.
UP Assembly Election 2022 Phase 7
UP Assembly Election 2022 Phase 7

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारी ( दिनांक ७ मार्च) अखेरच्या टप्प्यासाठी मतदान पार पडले असून निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघासह आझमगढ, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, भडोही, सोनभद्र आणि मिर्झापूर या जिल्ह्यांतील एकूण ५४ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यातील ११ जागा अनुसूचित जातींसाठी (Scheduled Castes) राखीव तर २ जागा अनुसूचित जमातीसाठी (Scheduled Tribes)राखीव आहेत.   

निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार (Election Commission) आजच्या टप्प्यात चंदौली येथे सर्वाधिक ५९.५४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सोनभद्र येथे ५६.८६ टक्के आणि मऊ येथे ५५.०१ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली आहे.  

आजच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात ५४ जागांसाठी ६१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.आतापर्यंतच्या सहा टप्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP)आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (SP) चुरशीच्या लढती पहायला मिळाल्या. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यांत पंतप्रधान मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यांसह किती जागा भाजपला मिळणार ? अशी उत्सुकता आहे. 

व्हिडीओ पहा- 

याशिवाय योगी सरकारमधील ७ मंत्र्याची प्रतिष्ठा लागली आहे. यामध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर,  मुद्रांक आणि नोंदणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रवींद्र जैस्वाल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र प्रभार) निलकंठ तिवारी,  गृहनिर्माण आणि नगर नियोजन मंत्री गिरीश यादव, ऊर्जा राज्यमंत्री रमाशंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. तसेच सहकार राज्यमंत्री संगीता यादव बळवंत, राज्यमंत्री संजीव गोंड, वन व पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सातव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या या ५४ जागांपैकी २०१७ च्या निवडणुकीत भाजपने )(BJP) २९ जागा जिंकल्या होत्या. तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने (SP) ११ जागा, बहुजन समाज पक्षाने (BSP) ६ जागा आणि निषाद पार्टीने एक जागा जिंकली होती. 

व्हिडीओ पहा- 

दिल्लीत झालेले किसान आंदोलन, हमीभावाच्या मागणीसह (MSP) शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चाने राबवलेले मिशन युपी (Mision UP) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath)यांच्याविरोधात सर्वसामान्य जनतेत असलेली नाराजी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सत्ताधारी भाजप (BJP)आणि समाजवादी पक्ष (SP)यांच्यात बहुतांशी ठिकाणी चुरशीच्या लढतीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत.

एक्झिट पोल्स काहीही सांगोत, मात्र उत्तर प्रदेशात समाजवाडी पक्षाला सहजपणे ३०० चा एकदा गाठता येईल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे (SP)प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav)यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com