अशी करा मारवेल गवताची जिरायती लागवड

वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवताची लागवड करावी.
Marvel fodder
Marvel fodderAgrowon

मारवेल (Marvel Grass) हे गवतवर्गीय चारा पीक आहे. मारवेल गवताची जिरायती तसेच बागायती अशा दोन्ही प्रकारे लागवड करता येते. पाण्याची उपलब्धता असेलल्या भागात मारवेल गवताची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. मारवेल गवतामध्ये प्रथिने ६ टक्के, काष्टमय तंतू ३८. ६० टक्के असतात. गवताची एकूण पचनियता ५८ टक्के आहे.

जमीन
मारवेल गवताच्या जिरायती लागवडीसाठी हलकी ते मध्यम स्वरुपाची जमीन चांगली असते. नांगरट व एक वेळा कुळवणी देऊन जमीन भुसभुशीत करावी. जून ते ऑगस्ट दरम्यान मारवेल गवताची पेरणी करावी.
लागवडीसाठी हेक्टरी ७५००० ठोंबे लागतात. लागवड करताना ठोंबे ४५ × ३० सेंटीमीटर अंतरावर लावावेत.

Marvel fodder
हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवत : फुले गोवर्धन

सुधारित जाती
चारा उत्पादनासाठी पारंपरिक वाणांचा वापर केल्यास पुरेसे उत्पादन मिळत नाही. सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. यासाठी फुले मारवेल-०६-४०, फुले मारवेल-०१ या जातीची लागवड करावी.


उत्पादन
जिरायती मध्ये किमान दोन कापण्या घेऊ शकता. बागायती क्षेत्र असल्यास वर्षभरात ६ ते ८ कापण्या करता येतात. जिरायती मध्ये मारवेल पिकापासून एका वर्षामध्ये हेक्टरी ३५० ते ४५० क्विंटल चारा उत्पादन मिळते.


खत व्यवस्थापन
पेरणीपूर्वी ३० किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे. प्रत्येक कापणी नंतर तीस किलो नत्र द्यावे. पेरणीनंतर एक खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com