Paddy : सिंधुदुर्गमधील ३४२ गावांची भातकापणीसाठी निवड

पिकांच्या उत्पन्नाची आकडेवारी निश्चित करण्यासाठी भातपिकांकरिता जिल्ह्यातील ३४२ गावांची तर तर नागली पिकांसाठी ६३ गावांची निवड करण्यात आली आहे.
Paddy
PaddyAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः पिकांच्या उत्पन्नाची आकडेवारी निश्चित करण्यासाठी भातपिकांकरिता (Paddy Crop) जिल्ह्यातील ३४२ गावांची तर तर नागली पिकांसाठी (Nagali Crop) ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. कृषी, महसूल विभागामार्फत कापणी प्रयोगाचे (Planning For Harvesting) नियोजन करण्यात येणार आहे. (Paddy Harvesting)

Paddy
आजऱ्यात चिखलातच भातकापणी

जिल्ह्यातील पिकांच्या उत्पन्नाची आकडेवारी राज्य आणि केंद्र शासनास मूलभूत धोरणविषयक बाबीसाठी आवश्यक असते. पीक विम्यासह नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी हीच आकडेवारी ग्राह्य धरली जाते. खरीप हंगामात भात पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील ३४२ गावांची भातपीक कापणी प्रयोगासाठी निवड करण्यात आली आहे. तर नागल पिकांसाठी ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. कापणी प्रयोगसाठी जिल्हास्तरावर दोन दिवसांचे प्रशिक्षण कृषी आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून तालुकापातळीवरील कर्मचाऱ्यांना २६ ते २९ जुलै या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्याच्या आवक स्थितीबाबत उपविभागीय स्तरावर सांख्यिकी योजनांचे काम पाहणारे कृषी पर्यवेक्षक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. भातकापणी प्रयोगासाठी महसूल विभागाकडे ७६ गावे, जिल्हा परिषद कृषी विभागाकडे १६१ गावे, तर राज्य कृषी विभागाकडे १०५ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. भात आणि नागली या दोन्ही पिकांसाठी ४०५ गावांची निवड करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com