ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं मैदान मारलं

कवठेमहांकाळ नगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीने रोहित पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती. त्यावर खरं उतरतं रोहित यांनी हे आव्हान लिलया पेललंय आहे.
Rohit RR Patil
Rohit RR Patil

सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रोहित आर. आर. पाटील (Rohit Patil) यांनी बाजी मारली आहे. रोहित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पॅनेलने १७ पैकी १० जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवाला आहे. या विजयामुळे राजकारणात रोहित यांनी यशस्वी पदार्पण केलं आहे. रोहित पाटील यांची ही पहिली मोठी निवडणूक होती. त्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होते.

कवठेमहांकाळ नगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादीने रोहित पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती. त्यावर खरं उतरतं रोहित यांनी हे आव्हान लिलया पेललंय आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी आपली ताकद सिध्द केल्याची चर्चा आता रंगली आहे. या निवडणुकीत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली होती. पण विरोधकांवर मात करत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते अजित घोरपडे, काँग्रेस (Congress) यांच्या शेतकरी विकास आघाडीने रोहित यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. (Rohit Patil won kavathe mahankal Nagar Panchayat Election)

व्हिडीओ पाहा - 

या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गटही त्यांच्या विरोधात आल्याची चर्चा होती. पण त्यांच्यावर मात करत रोहित यांनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. रोहित पाटील यांचं वय अवघं २३ वर्षांचं असून त्यांनीच प्रचाराची धुरा सांभाळली होती. निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत असून मी २५ वर्षांचा होईपर्यंत कुणालाच शिल्लक ठेवत नाही, हे प्रचारातलं रोहित यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. आता विजयानंतर रोहित यांनी त्यांच हे वक्तव्य खरं करून दाखवलं आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com