agricultural stories in Marathi, PDKV take Spraying Drone test | Agrowon

अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग

शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुरुवारी (ता.२०) करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार समूह अंतर्गत पॅडसन्स इंडस्ट्री त्यासोबतच टाटा कल्सन्टंसी सर्व्हिसेस व हैदराबाद येथील काही खासगी कंपन्यांचे सहकार्य याकामी घेण्यात आले. विदेशात हजारो एकरांवरील क्षेत्रावर कीटकनाशक फवारणीसाठी खास विमानांचा उपयोग होतो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात जमीनधारणा कमी असल्याने विमानाने फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे पाठीवरील पंपाच्या माध्यमातून मजुराद्वारे फवारणी केली जाते.

<p><strong>नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला प्रयोग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुरुवारी (ता.२०) करण्यात आला. कृषी विद्यापीठ, पडगीलवार समूह अंतर्गत पॅडसन्स इंडस्ट्री त्यासोबतच टाटा कल्सन्टंसी सर्व्हिसेस व हैदराबाद येथील काही खासगी कंपन्यांचे सहकार्य याकामी घेण्यात आले.&nbsp;</strong>विदेशात हजारो एकरांवरील क्षेत्रावर कीटकनाशक फवारणीसाठी खास विमानांचा उपयोग होतो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात जमीनधारणा कमी असल्याने विमानाने फवारणीला मर्यादा आहेत. त्यामुळे पाठीवरील पंपाच्या माध्यमातून मजुराद्वारे फवारणी केली जाते. नजीकच्या काळात फवारणीदरम्यान सुरक्षाविषयक साधणांकडे दुर्लक्ष केल्याने राज्यात ५५ शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूच्या घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर ड्रोनद्वारे फवारणीचा पर्याय पुढे येऊ लागला आहे.</p>