सिंधुदुर्गात मॉन्सूनचे वाजत गाजत आगमन...
शुक्रवार, 8 जून 2018कणकवली : गोवा राज्यात पोहचलेल्या मॉन्सूने आज (ता.८) सांयकाळी उशीराने सिंधुदुर्गातील काही भागात वाजत गाजत हजेरी लावली. दिवसभर मृगनक्षत्र कोरडे गेले मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम पाऊस कोसळत होता. समुद्राला अधुन मधुन तुफान येत असल्याने भरतीच्यावेळी किणाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू होता. दुपारनंतर ढगाळवातावरणाने अंधार दाडून आला होता.
<p><strong>कणकवली : गोवा राज्यात पोहचलेल्या मॉन्सूने आज (ता.८) सांयकाळी उशीराने सिंधुदुर्गातील काही भागात वाजत गाजत हजेरी लावली. दिवसभर मृगनक्षत्र कोरडे गेले मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात रिमझिम पाऊस कोसळत होता. समुद्राला अधुन मधुन तुफान येत असल्याने भरतीच्यावेळी किणाऱ्यावर उंच लाटांचा मारा सुरू होता. दुपारनंतर ढगाळवातावरणाने अंधार दाडून आला होता.</strong></p>
<p>हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी सिंधुदुर्गात अद्यापही मॉन्सूनचा जोर वाढलेला नाही. मॉन्सूनच्या हालचाली वेगात असल्यातरी गोवा राज्यात मॉन्सून सक्रीय होताना दिसत आहे. त्यामुळे कोकण किणार पट्टीत पावसाने तशी विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. यंदा मृगनक्षत्र कोरडे गेले अशी स्थितीती होती. पण सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. आज मेढा वाहन असल्याने दमदार पाऊस कोसळेल असे शेतकऱ्यांनी अंदाज वर्तवले होते. मात्र सकाळपासून सुर्याचे दर्शन तर काही काळ ढग आडवे येत होते. काही भागात रिमझिम पाऊस वगळतर आज दिवसभर पावसांने विश्रांती घेतली होती. शेतकरी मात्र पेरणीच्या कामात मग्न आहेत. नद्या नाल्याच्या पाणी स्त्रोतांना उगम सुरू झाले आहेत. कच्चे आणि पक्के बधांरे खुले करण्यात आले आहेत. किणारपट्टीत वादळ सदृश्य स्थिती पहाटेच्या वेळी होती. समुद्राचे पाणी गडूळ आहे. अधुनमधुन लाटाचा मारा आणि वेगवान वारे वाहत आहेत. </p>