सुभाष शर्मा : ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार
शुक्रवार, 10 मे 2019ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार सुभाष शर्मा (यवतमाळ) यांना प्रदान करण्यात आला. सर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळची ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील काही शेतकरी करीत आहेत. यवतमाळचे सुभाष शर्मा त्यापैकीच एक. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता बळकट करणे, शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार, बहुवीध पीक पद्धती, दर्जेदार उत्पादन, देशी गोसंगोपन, अशा विविध वैशिष्ट्यांनी शाश्वत शेतीचे मॉडेलच शर्मा यांनी उभे केले आहे.
<p>ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार सुभाष शर्मा (यवतमाळ) यांना प्रदान करण्यात आला. सर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळची ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील काही शेतकरी करीत आहेत. यवतमाळचे सुभाष शर्मा त्यापैकीच एक. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता बळकट करणे, शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार, बहुवीध पीक पद्धती, दर्जेदार उत्पादन, देशी गोसंगोपन, अशा विविध वैशिष्ट्यांनी शाश्वत शेतीचे मॉडेलच शर्मा यांनी उभे केले आहे.</p>