झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा नांदेड

नांदेड : जिल्ह्यातील हणेगाव (ता. देगलूर) महसूल मंडळाची सीमा कर्नाटक राज्यातील बिदर या दुष्काळी जिल्ह्याला लागून आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस म्हणजेच अपेक्षित पावसाच्या २५.६ टक्के (२२६ मिमी) पाऊस या मंडळामध्ये झाला. कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या मंडळातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांची सर्व दारोमदार खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांवरच असते. पण यंदा अल्प पावसामुळे या मंडळातील हणेगाव, कुडली, शिळवणी, कुमारपल्ली, लोणी, तुंबरपल्ली, वझर, येडूर, रमतापूर, कासरवाडी, बिजलवाडी, खुदमापूर, मातूर, बेबर, कोकलगाव, चव्हाणवाडी तांडा, सोमुर, भुत्तनहिप्परगा, अंबुलगा, सोमुर आदी गावशिवारांत दुष्काळाची दाहकता अधिकच गंभीर दिसत आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. विहिरी, बोअर, तलाव आटले आहेत. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. ओलावा नष्ट झाल्यामुळे जमिनीला लवकरच भेगा पडल्या हिवाळा सुरू होण्याआधीच उन्हाळा लागला की काय, अशी परिस्थिती या भागात दिसत आहे.(video : Manik Raswe)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com