agriculture news in marathi, how you will come to AGROWON Exhibition 2018 | Agrowon

...असे या ‘ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला !

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद : ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत २७ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजित भव्य कृषी प्रदर्शन मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चार दिवस चालणाऱ्या या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी आवर्जून सहभागी होत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने यंदा ''लढा दुष्काळाशी'' या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

<p>औरंगाबाद : ‘सकाळ-ॲग्रोवन’मार्फत २७ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजित भव्य कृषी प्रदर्शन मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. औरंगाबादमधील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चार दिवस चालणाऱ्या या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट तसेच कृषी आधारित व्यवसायातील मंडळी आवर्जून सहभागी होत आहेत. प्रदर्शनाच्या निमित्ताने यंदा ''लढा दुष्काळाशी'' या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी सहभागी होतील. त्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या वाटा शोधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. (video : Santosh Munde)</p>