द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट; ५० टक्के थेट नुकसान, २००० कोटींवर फटका
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019<p><strong>पुणे : सततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने राज्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बागायतदारांना २००० कोटींवर थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने खर्चाला सुमार राहिला नसून, फवारण्याकरूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. अशातच साधारणत: १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
<p><strong>पुणे : सततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने राज्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने बागायतदारांना २००० कोटींवर थेट फटका बसल्याचा अंदाज आहे. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने खर्चाला सुमार राहिला नसून, फवारण्याकरूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हातबल झाले आहेत. अशातच साधारणत: १५ ऑक्टोबरपासून लागू होणारा हवामान आधारित फळपीक विमा अद्यापही जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या झालेल्या व होणाऱ्या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल विचारत तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. </strong></p>