agriculture news in Marathi, report on drought from Aurangabad District, Maharashtra | Agrowon

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा औरंगाबाद

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : खर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्‍विंटल, तुरी गेल्या वाळून. दिवाळीआधीच उन्हाळा झाला. आता एक लाखाचा माल तरी होऊन राहिला का. व्याजानं पैसे काढले आता भरबाकी कशी व्हायची. याच्यापेक्षा पऊसच नसता आला तं पुरला असता. लोकांचे पैसे व्याजानं काढले नसते ना. कुठून द्यायचे आता हे. कुटुंबात दोन मुलं, दोन मुली आम्ही दोघ. शेतीतच आम्ही सगळे. लोकाचे द्यायचे, घर पोसायचे कसं? यातून उरलचं काय आता, अशा शब्दात औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथील सरूबाई नागरे यांनी आपली कैफियत मांडली. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत भीषण दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. खरीप हातचा गेलाय.

<p>औरंगाबाद : खर्च गंज झाला एक लाख रुपये, कापूस झाला साडेतीन क्‍विंटल, तुरी गेल्या वाळून. दिवाळीआधीच उन्हाळा झाला. आता एक लाखाचा माल तरी होऊन राहिला का. व्याजानं पैसे काढले आता भरबाकी कशी व्हायची. याच्यापेक्षा पऊसच नसता आला तं पुरला असता. लोकांचे पैसे व्याजानं काढले नसते ना. कुठून द्यायचे आता हे. कुटुंबात दोन मुलं, दोन मुली आम्ही दोघ. शेतीतच आम्ही सगळे. लोकाचे द्यायचे, घर पोसायचे कसं? यातून उरलचं काय आता, अशा शब्दात औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हणगाव येथील सरूबाई नागरे यांनी आपली कैफियत मांडली. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत भीषण दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. खरीप हातचा गेलाय. कपाशीचं उत्पादन दीड दोन क्‍विंटलच्या पुढं नाही. रब्बीची आशा नाही. साधारणपणे डिसेंबर जानेवारीपर्यंत चालणाऱ्या खरीप हंगामाची आक्‍टोबरमध्येच उलंगवाडी होण्याची स्थिती आहे. एक ना दोन वेचणीत कापूस संपल्यात जमा आहे. मका, बाजरीच्याही उत्पादनात मोठा फटका आहे. त्यामुळं आभाळंच कोसळल्यागत स्थिती झालेल्या शेतकऱ्यांना आधार म्हणून शासन काय पावले उचलतं हा खरा प्रश्न आहे. (video - Santosh Munde)</p>