agriculture news in Marathi, report on drought from Parbhani District, Maharashtra | Page 8 ||| Agrowon

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा परभणी

गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

परभणी ः मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच संमदी पिकं वाळून गेलीत. शेतात कामच शिल्लक राहिली नसल्यामुळे फॅक्टीवर जावं लागणार आहे. या वयात ऊस तोडावा लागणार, अशा शब्दांत पिंपळदरी (ता. गंगाखेड) जवळील निळा नाईक तांड्यावरील ज्येष्ठ शेतकरी सीताराम चव्हाण यांनी व्यथा सांगत मन मोकळं केलं.

<p>परभणी ः मिरगाला पाणी पडला तव्हा नदीला रटाऊन पूर आला व्हता. तव्हा ज्यांनी पेरलं त्यांचं साधलं; पण आम्ही पंधरा दिसांनी पेरलं ते नीट उगवलं नाही. यंदा कापूस, सोयाबीन, हाब्रिट समंदच वाळून गेलंय. कायीच आमदानी झाली नाही. गेलसाली बरं व्हतं संक्रांती पस्तोर कापूस, तूर सुरु होती, पण औंदा दिवाळीच्या आधीच संमदी पिकं वाळून गेलीत. शेतात कामच शिल्लक राहिली नसल्यामुळे फॅक्टीवर जावं लागणार आहे. या वयात ऊस तोडावा लागणार, अशा शब्दांत पिंपळदरी (ता. गंगाखेड) जवळील निळा नाईक तांड्यावरील ज्येष्ठ शेतकरी सीताराम चव्हाण यांनी व्यथा सांगत मन मोकळं केलं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्याची दोन भागांत विभागणी केली जाते. उत्तरेकडील महातपुरी, गंगाखेड मंडळातील गोदावरी नदी काठची काळी कसदार जमीन असलेला एक भाग तर राणीसावरगाव, माखणी मंडळातील बालाघाट डोंगर रांगांतील खडकाळ, उथळ, माळरानाचा दगडगोट्यांची जमीन असलेला दुसरा भाग. डोंगराळ भागातील गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील शेतकऱ्यांची सारी भिस्त खरीप हंगामावरच असते. नुसतं शेतावर भागत नाही. (Video - Manik Raswe)</p>