औरंगाबाद येथे सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास प्रारंभ
शनिवार, 28 डिसेंबर 2019औरंगाबाद : ‘सकाळ ॲग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दिमाखात करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा खजिना असणारे ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन औरंगाबाद येथील बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे. पारस ग्रुप हे मुख्य प्रायोजक आहेत. महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ॲक्मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), पूर्वा केमटेक, गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे सहप्रायोजक आहेत.