agriculture news in marathi, video report on Drought contition in Parbhani District, Marathwada | Agrowon

Drought 2019 : दुष्काळाच्या फेऱ्यात फळबागा व्हेंटिलेटरवर

रविवार, 26 मे 2019

परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे सद्यःस्थितीत दुष्काळाची दाहकता अधिकच जाणवत आहे. पाण्याअभावी होरपळत असलेल्या हजारो हेक्टरवरील फळबागा व्हेंटिलेटरवर आहेत. प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता अनेक शेतकरी जिवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. जिद्दीने दुष्काळाशी दोन हात करून झुंज देत आहेत. परंतु मॉन्सूनच्या आगमनास विलंब लागण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा चिंता वाढविणारी आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. जिल्ह्यत फळबागांचे क्षेत्र ५ हजार ४७४ हेक्टर आहे.

<p>परभणी ः जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे सद्यःस्थितीत दुष्काळाची दाहकता अधिकच जाणवत आहे. पाण्याअभावी होरपळत असलेल्या हजारो हेक्टरवरील फळबागा व्हेंटिलेटरवर आहेत. प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता अनेक शेतकरी जिवापाड जपलेल्या फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. जिद्दीने दुष्काळाशी दोन हात करून झुंज देत आहेत. परंतु मॉन्सूनच्या आगमनास विलंब लागण्याचा अंदाज शेतकऱ्यांचा चिंता वाढविणारी आहे. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. जिल्ह्यत फळबागांचे क्षेत्र ५ हजार ४७४ हेक्टर आहे. संत्रा, लिंबू, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, केळी ही प्रमुख फळपिके आहेत. त्यातही संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. परभणी, पूर्णा, मानवत, जिंतूर या तालुक्यात संत्रा फळपिकांखालील क्षेत्र अधिक आहे. सेलू, परभणी तालुक्यात लिंबाचे क्षेत्र आहे. पूर्णा, सेलू, पाथरी, मानवत, जिंतूर तालुक्यात मोसंबीचे तर पाथरी, परभणी, जिंतूर, मानवत आदी तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे उत्पादन घेतले जाते. सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात डाळिंब, पेरू, सीताफळ या फळपिकाची लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या दुष्काळात पाण्याअभावी सरपण झालेल्या संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, पपई आदी फळपिकांच्या बागा शेतकऱ्यांना मोडून टाकाव्या लागत आहेत. (Video story : Manik Raswe)</p>