agriculture news in marathi, Video story on Sangli District drought condition, Maharashtra | Agrowon

Drought 2019 : दुष्काळ पाहूनही मदतीचं आश्वासन नाय दिलं

गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

<p>कोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं दुष्काळी स्थिती बघण्यासाठी सरकार आलं हुतं. सरकारनं दुष्काळ पाहिला अन् निघून गेलं. दरवर्षी दुष्काळात सरकार येतं अन् जातं. त्यांना आमचा भाग म्हंजी पर्यटनस्थळ वाटू लागलं हाय. या भागात याचचं दुष्काळाचं चित्र पाहायचं आणि जायचं. आम्हाला काहीतरी मदत करतील अशी आशा हुती. पण सरकार मोकळ्या हातानं आलं अन् मोकळ्या हातानंच मागं फिरलं. मदतीचं आश्वासन बी नाय दिलं, अशी व्यथा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत सध्या तीव्र दुष्काळी स्थिती आहे.

<p>कोल्हापूर/सांगली ः गेल्या महिन्यात आमच्याकडं दुष्काळी स्थिती बघण्यासाठी सरकार आलं हुतं. सरकारनं दुष्काळ पाहिला अन् निघून गेलं. दरवर्षी दुष्काळात सरकार येतं अन् जातं. त्यांना आमचा भाग म्हंजी पर्यटनस्थळ वाटू लागलं हाय. या भागात याचचं दुष्काळाचं चित्र पाहायचं आणि जायचं. आम्हाला काहीतरी मदत करतील अशी आशा हुती. पण सरकार मोकळ्या हातानं आलं अन् मोकळ्या हातानंच मागं फिरलं. मदतीचं आश्वासन बी नाय दिलं, अशी व्यथा जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत सध्या तीव्र दुष्काळी स्थिती आहे. योजनांचे पाणी ज्या गावात गेले नाही त्या गावात बिकट अवस्था आहे. तीव्र ऊन आणि या रणरणत्या उन्हात एकेक घागरी पाण्यासाठी चाललेली धडपड असे अस्वस्थ करणारे चित्र गावोगावी दिसते. (Video Story : Rajkumar chougule &amp; Abhijeet Dake)</p>