धान्य वाटपासाठी ATM सारखे मशीनचा वापर ?| ॲग्रोवन

ओडिशामध्ये (Odisha) धान्याचं वाटप (Grain Distributor) करणाऱ्या या मशिन्सचं बारसं ऑल टाइम ग्रेन (ATG) असं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना या मशिन्सच्या माध्यमातून धान्याचं वाटप केलं जाणार आहे. राज्याचे अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री अतनू नायक (Atanu Nayak) यांनी नुकतीच ही माहिती दिली.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार एटीएम (ATM) मशिन्ससारख्याच या मशीन असणार आहेत. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील शहरी भागात या मशिन्स सुरु करण्यात येणार आहेत.

सुरुवातीला राजधानी भुवनेश्वरमध्ये (Bhuvneshwar) या एटीजी मशिन्स बसवण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी एटीजी किऑस्क उपलब्ध करून दिले जातील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com