जागतिक Chana Production घटण्याची शक्यता |Chana Market|ॲग्रोवन

यंदा जगातील हरभरा उत्पादन (Chana Production) घटण्याची चिन्हे आहेत. प्रमुख हरभरा उत्पादक देशांमध्ये पिकाला प्रतिकूल वातावरण आहे. रशिया आणि युक्रेन हरभरा पुरवठ्यात आघाडीवर आहेत. मात्र युद्धामुळे या दोन्ही देशांतील लागवड आणि निर्यातीवर परिणाम झालाय. युक्रेनमध्ये तर पेरणीही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे चालू हंगामात जागतिक हरभरा उत्पादन २० टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे.

अनेक देशांत वातावरणीय बदलांमुळे (Climate Change) हरभऱ्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झालाय. तसेच पुरवठा साखळीही काही प्रमाणात विस्कळीत झाली. युक्रेनवर हल्ला करण्याआधी रशियाने मोठ्या प्रमाणावर हरभरा निर्यात केली होती. जागतिक हरभरा निर्यातीत रशियाचा वाटा २५ टक्के होता. ऑस्ट्रेलिया हरभरा उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे पिकांना दुष्काळी स्थितीचा फटका बसतोय. तसेच निर्यातदारांना मालवाहतुकीसाठी झगडावं लागतंय.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा हरभरा निर्यातदार (Chana Exporter) असलेल्या टर्कीमध्ये यंदा स्थिती नाजूक आहे. अन्नधान्याची वाढती टंचाई आणि भाववाढ यामुळे तिथं अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे टर्कीने हरभरा निर्यातीवर बंदी घातलीय. अमेरिकेत काही भागात दुष्काळ आणि काही भागांत पूरस्थिती असल्याने हरभरा उत्पादनावर परिणाम झालाय.

इंधनाचे दर (Fuel Price) वाढल्यामुळे जहाजे आणि रस्तेमार्गे होणाऱ्या वाहतुकीचा खर्च वाढलाय. परिणामी हरभरा महाग होतोय. अमेरिकेत गेल्या वर्षीपेक्षा हरभऱ्याचे दर १२ टक्क्यांनी वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही मागील काही दिवसांत दर सुधारलेत. जागतिक हरभरा उत्पादन घटीचा अंदाज खरा ठरल्यास दर आणखी सुधारतील, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com