जगात Edible Oil Market Rate घसरले |Edible Oil Market|ॲग्रोवन

मागील वर्षभरात खाद्यतेल बाजाराने जगाला जेरीस आणलं आहे. मात्र मागच्या महिनाभरात खाद्यतेल बाजारातील तेजी कमी झाली. मागील पंधरा दिवसांत तर आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात अक्षरशः मोठी पडझड पाहायला मिळाली. इंडोनेशियानं वाढवलेली निर्यात आणि रशिया-युक्रेनमधून सुरु झालेला पुरवठा, यामुळं दर कमी झाल्याचा दावा जाणकारांनी करत आहेत.

इंडोनेशियाने ऑगस्ट महिन्यात पामतेल निर्यातीवर लेवी न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पामतेल आयात आणखी स्वस्त होईल. मात्र असे असतानाही भारतासह मुख्य आयातदारांची पामतेल खरेदी वाढलेली नाही. त्यातच रशियाने सूर्यफुल तेल निर्यातीचा कोटा वाढवला.

युक्रेनमधूनही सुर्यफूल तेल निर्यात सुरु झाली. एकूण जगात खाद्यतेलाचा पुरवठा वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहून भारतानेही मोजकी खरेदी सुरु ठेवली आहे.

तसंच देशात सोयाबीनच्या पेरणीने आता वेग घेतला. सोयाबीनखालील क्षेत्र १५ जूनपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा वाढले. त्यामुळं देशात तेलबिया उत्पादन वाढीची शक्यता आहे. तर खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने अनेक बंधने लादली.

भारतात श्रावण महिन्यात लोक शाकाहारी आहाराला प्राधान्य देतात. परिणामी या काळात खाद्यतेलाची मागणी घटलेली असते.

परिणामी दर कमी होऊनही भारतातून खाद्यतेलाची मागणी वाढली नाही. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर सतत कमी होत आहेत. त्यामुळं तेलाचा साठा करण आयातदार आणि व्यापाऱ्यांसाठी तोट्याचं होऊ शकतं. परिणामी देशातून आवश्यतेप्रमाणे खरेदी होत असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com