राज्यात Farmer Loan Wavier चा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला ? | ॲग्रोवन

एसबीआयच्या (SBI) अभ्यासातून असं दिसून आलं की सुमारे ३.७ कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी (Farmer Loan Wavier) पात्र असताना त्यातल्या केवळ ५० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली.

खरं तर शेतीचं दुखणं गुंतागुंतीचं आहे. कर्जमाफी (Loan Wavier) हे फक्त सलाईनसारखं काम करतं. त्यामुळे मूळ दुखण्यावर इलाज होत नाही. परंतु तरीही आजपर्यंत जवळपास सगळ्या पक्षांच्या सरकारांनी कर्जमाफी योजना राबवली आहे. स्टेट बँकेने (State Bank) केलेल्या अभ्यासत २०१४ पासून मार्च २०२२ पर्यंतची कर्जमाफी प्रकरणं अभ्यासण्यात आली.

मार्च २०२२ पर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची राज्यनिहाय टक्केवारी बघायला गेलं तर तेलंगणामध्ये ५ %, मध्यप्रदेश १२ %, झारखंड १३ %, पंजाब २४ %, कर्नाटक ३८ % आणि उत्तरप्रदेशमध्ये ५२ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. यात उत्तरप्रदेश राज्याची अवस्था सर्वात वाईट आहे.

तर दुसरीकडे छत्तीसगड आणि महाराष्ट्राची (Maharashtra Karjmafi) कामगिरी मात्र उत्तम आहे. छत्तीसगड सरकारने २०१८ मध्ये आणि महाराष्ट्र सरकारने २०२० मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. यात छत्तीसगडमध्ये १०० टक्के शेतकऱ्यांना तर महाराष्ट्रात ९१ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली.

एसबीआयच्या अहवालानुसार, महाराष्ट्राने २०१७ मध्येही कर्जमाफी योजना राबवली होती. त्यावेळी ६७ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यातल्या ६८ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com