केंद्र सरकार Fertilizer उत्पादक देशांमध्ये गुंतवणूक करणार ? | ॲग्रोवन

भारत हा शेती उत्पादनात जगातील एक प्रमुख देश आहे. जागतिक अन्नसुरक्षेच्या (World Food Security) दृष्टीने भारताची भूमिका महत्त्वाची आहे. गहू आणि भाताच्या (Wheat And Rice) उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाची खतांची (Fertilizer) गरज दरवर्षी वाढत आहे. ही गरज आयातीच्या (Fertilizer Import) माध्यमातून भागवली जाते. तसेच दरवर्षी ऐनवेळी खरेदीचे व्यवहार करून जुळवाजुळव केली जाते. सरकारने आता हा दृष्टिकोन बदलण्याचं ठरवलं आहे.

‘‘खतांच्या पुरवठादार देशांबरोबर केवळ खरेदीदार-विक्रेता एवढ्यापुरतंच मर्यादीत नातं आम्हाला ठेवायचं नाही. त्याच्या पुढं जाऊन या देशांबरोबर व्यूहरचनात्मक भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्या देशांमध्ये खत निर्मिती उद्योगाच्या पायाभूत सुविधांमध्ये आम्ही गुंतवणूक करू इच्छितो," असे मांडवीय म्हणाले. (Mansukh Mandviya)

भारतीय खत कंपन्या (Indian Fertilizer Company) सेनेगल मधील फॉस्फोरिक आम्लाच्या खाणी, सौदी अरेबियातील डीएपीच्या (DAP) खाणी आणि आफ्रिका व कॅनडातील (Canada) अशाच स्वरूपाच्या खाणींमध्ये भागभांडवल विकत घेण्यासाठी चाचपणी करत आहेत, असेही ते म्हणाले.

भारताची खतांची वार्षिक गरज ६०० लाख टन आहे. त्यातील सुमारे २०० लाख टन खतांची आयात केली जाते. भारतात खतांसाठी शेतकऱ्यांना अनुदान (Fertilizer Subsidy) दिलं जातं. हे अनुदान थेट शेतकऱ्यांना न देता खत उत्पादक कंपन्यांना दिलं जातं. त्यामुळे या कंपन्या सवलतीच्या दरात खतं बाजारात आणतात. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती वाढल्या. तसेच रशिया-युक्रेन युध्दामुळे पाश्चिमात्य देशांनी खत निर्यातीवर (Fertilizer Export) बंधनं घातली. त्यामुळे खतांच्या तुटवड्याचा प्रश्न आणखीनच चिघळला. खते महागल्यामुळे सरकारला यंदा खतांसाठीच्या अनुदानात मोठी वाढ करावी लागली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com