Integrated Pest Management मध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?|Pest Control | Agrowon|

मागील काही वर्षात कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळं आणि भाजीपालामध्ये आढळू लागले आहेत. त्याचा परिणाम मानवाच्या आणि जनावरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला किडींची प्रतिकारशक्ती ही वाढली आहे. मित्र कीटक, परागीभवन करणाऱ्या कीटकांची संख्या कमी होत आहे.

दुय्यम किडी मुख्य किडी बनल्या आहेत. शेतमाल निर्यातीतही अडचणी येत आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करायला हवा. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवली जाते. या व्यवस्थापन तंत्रामध्ये तांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, अनुवंशिक पर्यावरण पद्धतीचा वापर केला जातो. तर पाहुयात एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

१) विविध किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे आणि निळ्या, पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो. उदाहरणार्थ ः घाटे अळी आणि पाने खाणारी अळी या किडीच्या नर पतंगाला आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्याचा वापर करावा. फुलकिडाच्या नियंत्रणासाठी निळ्या रंगाच्या चिकट सापळ्याचा वापर करावा.

२) पिकावरील हानीकारक आणि उपयुक्त कीटकांची ओळख करुन घ्यावी. याशिवाय पीकनिहाय किडींचा जीवनक्रम आणि संवेदनक्षम अवस्थांची माहिती करुन घेणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com