शेतकऱ्यांवर वाढीव पाणीपट्टीचा बोजा

राज्यातल्या कृषी सिंचनाच्या दरात वाढ करायला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिलीये. राज्यातल्या घरगुती, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातल्या पाणी वापराचे दर याआधी २०१८ मध्ये निश्चित करण्यात आले होते.
Maharashtra Water Resources Regulatory Authority approves increase in agricultural irrigation rates in the maharashtra.
Maharashtra Water Resources Regulatory Authority approves increase in agricultural irrigation rates in the maharashtra.Agrowon

राज्यातल्या कृषी सिंचनाच्या दरात वाढ करायला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मान्यता दिलीये. राज्यातल्या घरगुती, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातल्या पाणी वापराचे दर याआधी २०१८ मध्ये निश्चित करण्यात आले होते. पाणी वापराच्या हिशेबाचे जलवर्ष हे १ जुलै ते ३० जून असे विचारात घेतले जाणार असून नवी पाणीपट्टी १ जुलै २०२२ पासून पुढच्या तीन वर्षांसाठी लागू असणार आहे , अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘‘कोविडमुळे १ जुलै २०२० ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नव्हती. त्यावेळी २०१८ मधल्या दरांनाच मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र निश्चित केलेल्या पाणीपट्टीतले दर १ जुलै २०२२ ते ३० जून २०२४ मध्ये १० टक्के वाढीसह लागू असतील. तसेच, २०२४ ते २०२५ या कालावधीत ही वाढ २० टक्के लागू राहील. स्थानिक उपकरा व्यतिरिक्त हे दर असतील,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रवाही सिंचनामध्ये होणारा पाणी वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी यापुढे सिंचनाचा संपूर्ण पाणी पुरवठा आणि पाणीपट्टी आकारणी घनमापन पद्धतीनेच करावी, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मात्र, घनमापन पद्धतीने पाणी पुरवठा करताना काही समस्या येतात. त्यामुळे पाणी वापर संस्था आणि उपसा जलसिंचन योजना वगळून इतर पाणी वापरकर्त्यांना जलमापनयंत्र बसवेपर्यंत ठोक दराने पीकनिहाय आणि हंगामनिहाय पाणीपट्टी आकारावी, असा निर्वाळा प्राधिकरणाने दिला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com