हवामानानूसार पिकांचे, फळबागेचे Management कसे कराल ? | ॲग्रोवन

गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जास्त पाऊस (heavy Rain) झालेल्या भागातील पिकात, फळबागेत, भाजीपाला पिकात, फुल पिकातील अतिरीक्त पाण्याचा निचरा करावा. कारण शेतात सतत पाणी साठून राहिल्यामुळे पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. कापूस आणि तूर पिकात मर, सोयाबीन (Soybean) पिकात पाने पिवळी पडणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यानुसार उपाययोजना कराव्यात.

पीक व्‍यवस्‍थापनात काय बदल कराल?
कापूस पिकात आकस्मिक मर किंवा मूळकुज दिसून आल्यास कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम + युरीया २०० ग्रॅम + पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड १०० मिली द्यावे. रसशोषण करणाऱ्या मावा, तूडतूडे किडींचा प्रादूर्भाव झाल्यास नियंत्रनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लेकॅनी ४० ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रिड (२० टक्के) ६० ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० टक्के) २६० मिली प्रति एकर याप्रमाणे पावसाची उघड बघून फवारणी करावी.

सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास किंवा क्लोरॉसीस ची लक्षणे दिसून येत असल्यास शेतात वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ ची ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघड बघून फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com