Monsoon Rain थांबल्याने शेतीकामांना वेग | Monsoon | Agrowon | ॲग्रोवन

कोकणात अनेक भागांत पावासाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू या फळझाडांना खते देण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी भातरोप लागवडीच्या कामांना वेग आलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी झाल्या. मात्र बहुतेक भागात पाऊस नव्हता.

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर थांबला. त्यामुळं महापुराची भीतीही कमी झाली. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी पडतायेत. मात्र जोर कमी आहे. त्यामुळं नवीन ऊस लावणीत शेतकऱ्यांनी लक्ष घातलंय. पुणे जिल्ह्यातही पावसानं विश्रांती घेतली.पश्चिम पट्यातही मावळ वगळता मुळशी, भोर, वेल्हा, नगर जिल्ह्यातील मुळा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

या पावसामुळं कामशेत परिसरातील गावांचा व आठ वाड्यांचा संपर्क तुटलाय. रस्ता फुटला, बांध फुटला, शेतांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झालंय. विदर्भातही अनेक भागांत पावसानं उघडीप दिलीये. पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र पावसाचं प्रमाण कमी होतं. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळं सव्वालाख हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झालंय. तर अमरावती जिल्ह्यात जवळपास ३०० किलोमीटरचे रस्ते खरडून गेले. शिवाय लहान-मोठे ८० पूल वाहून गेले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com