देशातून Mustard Meal Export ८४ टक्क्यांनी वाढला |Soybean Market|ॲग्रोवन |

तेलबियांचं (Edible Oil) गाळप करून तेल काढल्यानंतर पेंड मिळते. यात प्रोटीन (Protein) जास्त असतं. त्यामुळं त्याचा वापर पशुखाद्यात होतो. भारतानं एप्रिल ते जून या तिमाहीत १० लाख २१ हजार टन तेलबिया पेंड निर्यात केली.

मागीलवर्षी याच काळातील निर्यात ७ लाख ३५ हजार टन होती, असं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएनं (SEA) म्हटलंय. यात मोहरीपेंड निर्यात तब्बल ८४ टक्क्यांनी वाढली. यंदा ७ लाख ७ हजार टन मोहरीपेंड भारतानं निर्यात केली. तर जून महिन्यात विक्रमी ४ लाख ३१ हजार टनांची निर्यात झाली. सोयापेंड निर्यात मात्र ३६ टक्क्यांनी कमी राहीली. सोयापेंडेचा मुख्य ग्राहक पोल्ट्री उद्योग आहे.

सोयापेंडेच्या दरावरूनच सोयाबीनचे दर ठरतात. मात्र मागील हंगामात खाद्येतलाचे दर जवळपास दुप्पट झाले होते. त्यामुळं वाढलेल्या दरात सोयाबीन खरेदी करणं प्रक्रियादारांना परवडलं होतं. पण सोयाबीन जास्त दरानं खरेदी केल्यानं सोयापेंडचे दरही अधिक झाले. परिणामी देशातून सोयापेंड निर्यात घटली.

गेल्यावर्षी याच तीमाहीत १ लाख १८ हजार टन सोयापेंड (Soymeal) निर्यात झाली होती. मात्र यंदा निर्यात ७६ हजार टनांवर स्थिरावल्याचंही एसईएनं सांगितलंय. सध्या भारतीय सोयापेंडेचा निर्यातीसाठीचा दर ६७५ डाॅलर प्रतिटन पडतोय. तर अर्जेंटीनाकडून ५३९ डाॅलरनं आणि ब्राझीलकडून ५२२ डाॅलर प्रतिटनानं सोयापेंड मिळतेय.

देशातून निर्यात कमी झाली आणि खाद्यतेलाचेही दर नरमले. त्यामुळं सोयाबीनवर दबाव आलाय. परिणामी सोयाबीनचे दर ६ हजार ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com