NCDEX ने Spices साठी 'ऑप्शन्स' उपलब्ध करून दिलं ? | ॲग्रोवन

ऑप्शनचा म्हणजे काय ? तर ऑप्शन्स म्हणजे एक प्रकारचं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतं. आपण यासाठी एक उदाहरणचं घेऊ. जूनमध्ये खरीप हंगामाची सुरुवात होते. साधारण ऑक्टोबर महिन्यात पीक काढणीला येतात. आता ऑक्टोबर महिन्यात खुल्या बाजारात त्याचा भाव काय असेल याचा अंदाज बांधण कठीण असतं. पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव तर पाहिजे. मग अशावेळी ऑप्शन हा पर्याय सोपा ठरतो. शेतकरी पिकाचा भविष्यातला भाव सुरक्षित करू शकतात.

उदाहरण म्हणून सोयाबीन घेऊ. सध्याच्या मंदीमध्येसुद्धा सोयाबीनचा पाच टनांचा एक लॉट विकण्यासाठी तुम्ही ऑप्शन वापरून विक्रीचा भाव निश्चित करु शकता. यासाठी सध्या सुरू असलेला भाव आणि भविष्यात जो भाव राहील त्यातला अंतर काय असेल त्याचा हप्ता भरून शेतकरी विक्रीचा भाव निश्चित करू शकता.

पुढे पीक काढणीला आल्यावर जर खुल्या बाजारात पिकाचे रेट जास्त असतील तर पुट ऑप्शन वापरून खुल्या बाजारात तुमचं उत्पादन विकू शकता. म्हणजे शेतकऱ्यांकडे आपला माल कोणाला विकायचा याचा हक्क राहतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com