Organic Farming चा नाद सोडून SriLanka भारताकडून NanoUrea खरेदी करणार. | ॲग्रोवन

श्रीलंका सध्या आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा पडलाय. सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालंय. श्रीलंकेवर ओढवलेल्या या परिस्थितीला अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण सेंद्रीय शेतीचा तुघलकी अट्टाहास हे सांगितलं जातंय. काही महिन्यांपूर्वी श्रीलंका सरकारने अचानक सेंद्रीय शेती करण्याचं फर्मान काढलं.

श्रीलंका सरकारला अखेर आपली चूक दुरूस्त करावी लागली. आर्थिक दिवाळं निघालेल्या श्रीलंकेनं सेंद्रीय शेतीचा अट्टाहास सोडून दिला. रासायनिक खतांवर पूर्ण बंदी घातल्याचे दुष्परिणाम लक्षात आले. त्यामुळे श्रीलंका सरकारला घुमजाव करावं लागलंय. रासायनिक खतांची आयात करण्यास आता परवानगी देण्यात आलीय. त्यानुसार पहिली ऑर्डर मिळाली ती भारतातल्या इफ्को कंपनीला. श्रीलंका सरकार इफ्कोकडून नॅनो युरिया खरेदी करणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com