देशात pre-packaged, labeled agri products वर जीएसटी लागू|Food GST|Agrowon | ॲग्रोवन

आजपासून सरकारने पॅकिंग आणि लेबल असलेल्या नॉन ब्रॅण्डेड अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी लागू केला. त्यात धान्यापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांचाही समावेश आहे. तसेच दुग्धजन्य पदार्थांवरही हा जीएसटी लागू असेल. याचा थेट भार ग्राहकांवर पडेल. मात्र शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणार आहे. तो कसा? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

देशात जीएसटी कायदा लागू करताना केंद्राने अन्नधान्यावर जीएसटी लागू होणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र आधी ब्रॅंडेड अन्नधान्यावर जीएसटी लावण्यात आला. आणि आता आजपासून पॅकिंग व लेबल असलेल्या नॉनब्रॅण्डेड अन्नधान्य व खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू करण्यात आला. यात कडधान्ये, गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, मका आदी सर्व प्रकारची धान्ये, तसेच त्यापासून तयार होणारे पदार्थ जसे की पीठ, मैदा, रवा यांच्यावरही जीएसटी लागू असेल. त्यासोबतच दही, पनीर, ताक आदी दुग्धजन्य पदार्थ आणि चिरमुरे, गूळ, पापड यांसारख्या वस्तूंचाही जीएसटीमध्ये समावेश असेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com