उत्तर मराठवाडा, विदर्भात Rain with Thunderstorm ची शक्यता |Hawaman Update|Agrowon| ॲग्रोवन

पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी विदर्भाकडे सरकले आहे. त्यातच मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्यामुळे राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाची संततधार वाढली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर मराठवाड्यात ढगांची दाटी झाली होती.

विदर्भात रविवारपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे.आज (ता. १९) विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर औरंगाबाद, जालना जिल्ह्यांसह उर्वरित विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com