मागील वर्षी अमेरिकेत (America) १२०.७ दशलक्ष टन उत्पादन झालं होतं. मात्र यंदा उत्पादन १२२.६ दशलक्ष टनांवर राहील, असा अंदाज युएसडीएने (USDA) जुलैच्या अहवालात दिला आहे. पण जून महिन्यातील अहवालात १२६ दशलक्ष टनांचा अंदाज दिला होता. म्हणजेच एका महिन्यात उत्पादनाच्या अंदाजात ३.४ दशलक्ष टनांची कपात करण्यात आली आहे. कारण सध्या अमेरिकेतील अनेक भागांत दुष्काळी स्थिती (Drought Condition) आहे. सोयाबीन पिकाला पाणी कमी पडत असल्याच्या बातम्या अनेक भागांतून आल्या आहेत.
काही ठिकाणी मागील आठवड्यात पाऊस (Rain) झाला. पण उष्णता (Heat) वाढल्यानं त्याचा पिकाला फायदा झाला नाही. पण या उष्णतेचा सोयाबीन उत्पादकतेवर कहीच परिणाम होणार नाही, असं अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले आहे. युएसडीएचा दावा जास्त उत्पादनाचा असला तरी ऐन शेंगा भरण्याच्या काळात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळं याचा उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो, असे अमेरिकेतील काही संस्थांनी सांगितलं.
२०१८ पर्यंत जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनामध्ये अमेरिका (Soybean Production In America) आघाडीवर होता. मात्र अनुकूल वातावरण आणि सिंचनाच्या सुविधांमुळे ब्राझीलमधील (Brazil) सोयाबीन उत्पादनात मोठी वाढ झाली. त्यामुळं ब्राझीलनं अमेरिकेला सोयाबीन उत्पादनात मागं टाकलं. २०२२-२३ मध्ये अमेरिकेत गेल्यावर्षीपेक्षा अधिक उत्पादन होईल, असे युएसडीएने (USDA) म्हटलंय.
सोयाबीन हंगामाचा विचार केला तर अमेरिकेचं पीक सर्वात आधी बाजारात येतं. तसंच अमेरिकेच्या पिकावरून अनेकदा बाजाराचा अंदाजही लावला जातो. त्यामुळं अमेरिकेत किती सोयाबीन उत्पादन होतं हे पाहणं गरजेचं ठरतं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.