Trap Crop मुळे कीड नियंत्रण होते? | ॲग्रोवन

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठल्या पिकामध्ये कुठली सापळा पिकं घ्यावीत? राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं त्यासाठी पुढील शिफारसी केल्या आहेतः

झेंडू (Tagetes erecta) मावा व इतर किडींना पिकापासून दूर हाकलतो. झेंडूमुळे जमिनीतील सूत्र कृमीचं नैसर्गिक नियंत्रण होतं. मधमाशा व मित्र किडी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. त्यामुळे पिकातील परागीभवन क्रिया वाढते.

तूर हे मित्र किडींचं आणि परजीवी किटकांचं आवडतं पीक आहे. गाजराची फुलं मधमाशा, परजीवी मित्र कीटक व इतर मित्र किडींना आकर्षित करतात.

मोहरीचं पीक मावा किडीला आकर्षित करून मुख्य पिकांचं किडीपासून संरक्षण करतं. करणारे उत्तम सापळा पीक आहे. मोहरीमुळे सूर्यफूल, करडई, कोबी, फुलकोबी, मिरची, भाजीपाला व फळझाडांचा किडीपासून बचाव होतो.

मकासुध्दा (Maize) अनेक मित्रकिडी आणि परजीवी किटकांचं आश्रयस्थान आहे. पक्षी मक्यावरील अळ्या वेचून खातात.

थोडक्यात काय, तर एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध घटकांपैकी सापळा पीक लागवड अतशिय उपयुक्त पध्दत आहे. सापळा पिकांमुळे निसर्गाचा समतोल राखून किडींना आर्थिक नुकसान पातळीच्या खाली रोखता येते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com