केंद्राकडून Tur Import चे पाच वर्षांसाठी करार |Tur Market|ॲग्रोवन

केंद्र सरकारने कोणताही तातडीची गरज नसताना तूर आणि उडीद आयातीसाठी दीर्घ कालावधीचे करार केले आहेत. हा करार २०२१-२२ ते २५-२६ या काळासाठी करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षे म्यानमार, मोझांबिक आणि मालावी या देशांतून आयात होणार आहे.

या करारानुसार दरवर्षी म्यानमारमधून अडीच लाख टन उडीद आणि एक लाख टन तूर आयात केली जाणार आहे. तर मालावीतून वर्षाला ५० हजार टन तूर आयात होईल. आणि मोझांबिकमधून वार्षिक दोन लाख टन तूर आयात केली जाईल.

देशातील डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करार करण्यात आले, असे सरकारने स्पष्ट केले. पण मागील वर्षात देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाचे दर तेजीत होते. मात्र विक्रमी आयातीमुळं कडधान्याच्या दारने हमीभावही गाठला नाही.

मागील हंगामात तुरीचे उत्पादनही घटले होते. मात्र सरकारने विक्रमी ८ लाख ४० हजार टन तूर आयात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळाला नाही. गेल्या हंगामात तुरीला ६३०० रुपये हमीभाव सरकारने जाहिर केला होता. मात्र विक्रमी आयातीमुळे आत्तापर्यंत तुरीच्या दराने हमीभावही गाठला नाही.

यामुळे तूर उत्पादकांना मोठा फटका बसला. परिणामी चालू खरिपात तुरीची लागवड कमी होताना दिसत आहे. त्यातच सरकारने आता करार करून आयातीचा निर्णय घेतला. याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होईल. त्यामुळे शेतकरी पेरा कमी करतील.

सरकारच्या या धोरणामुळे देशात तूर उत्पादन कमी होऊन खाद्यतेलाप्रमाणे कायम आयातच करावी लागेल, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com