पूर्व Vidarbha, पूर्व Marathwada तुरळक ठिकाणी विजांसह Rain ची शक्यता | ॲग्रोवन

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा (Monsoon) आस, पश्चिम किनारापट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने राज्याच्या विविध भागात पावसाने उघडीप दिली आहे. गुरूवारी ढगाळ हवामान, उन सावल्यांचा लपंडाव सुरू होता.

आज पूर्व विदर्भातील (Vidarbha) चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

मॉन्सूनच्या पावसाने उघडीप दिली. त्यामुळं राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com