जनावरांना उसाचे वाडंं दिल्यास शरीरात 'या' घटकांची कमतरता?

चारा टंचाईमुळे जनावरांना उसाचे वाढे मोठ्या प्रमाणात दिले जाते. उसाच्या वाढ्यामध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असते. उसाचे वाढे जनावरांनी खाल्ल्यानंतर त्यातील ऑक्झलेट शरीरातील कॅल्शियमबरोबर संयोग पावून कॅल्शियम ऑक्झलेट तयार होते.

शरीरात तयार झालेलं कॅल्शियम ऑक्झलेट विद्राव्य असून, ते लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. कॅल्शियम बाहेर गेल्याने शरीरातील फॉस्फरसचे शोषणही कमी होते. शरीरातील कॅल्शियम बाहेर पडल्यानं वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि दूध देणाऱ्या जनावरांच्या दूध निर्मितीसाठी कॅल्शियम उपलब्ध होत नाही.

दुष्काळात चारा छावणीमध्ये स्वस्तात ऊसाचे वाढे उपलब्ध होत असते. या वाढयांवर प्रक्रिया करून आपण त्यांची सकसता वाढवू शकतो. यासाठी दोन किलो कळीच्या चुन्यात १५ ते २० लिटर पाणी टाकून मातीच्या भांड्यात किंवा प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ठेवावे. यातून दर बारा तासांनी ३ लिटरपर्यंत निवळी काढता येते. सोबतच मिठाचे २ टक्के द्रावण स्वतंत्र बनवून घ्यावं.

वाढयांवर प्रक्रिया करण्यासाठी स्वच्छ जमिनीवर वाढ्याचा एक थर पसरावा. झारीच्या सहाय्याने या वाढ्यावर चुन्याची निवळी आणि मिठ फवारावे. त्यावर पुन्हा दुसरा थर देऊन मिश्रणांची फवारणी करावी. असे थर तयार करून प्रक्रिया केलेले वाढे २४ ते ४८ तासांनी जनावरांना खाऊ घालावेत. उसाच्या वाढ्यांवर प्रक्रिया केल्यानं शरीरात होणारी क्रिया शरीराबाहेरच होत असल्यानं, शरीरातील कॅल्शियमवर कोणताही परिणाम होत नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com