टेंभू सिंचन प्रकल्पातील पाणी फेरनियोजन अंतिम टप्प्यात

योजनेच्या एकूण ४५१ किलोमिटर पैकी ४४६ किलोमीटर लांबीचे कालवे पूर्ण व प्रवाहित झाले आहेत. उर्वरित कालवा कामे जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेजलसंपदामंत्री (Water Resources Minister) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी (दिनांक २४ मार्च) विधानसभेत सांगितले.
Water re-planning of Tembhu Irrigation Project in final stage
Water re-planning of Tembhu Irrigation Project in final stage

टेंभू उपसा सिंचन (Tembhu Lift Irrigation) प्रकल्पातील पाण्याच्या फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात असून यावर महिनाभरात अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे जलसंपदामंत्री (Water Resources Minister) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी (दिनांक २४ मार्च) विधानसभेत सांगितले.

आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना जलसंपदामंत्री (Water Resources Minister) जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. टेंभू उपसा सिंचन योजनेंतर्गत (Tembhu Lift Irrigation) कृष्णा नदीवर बॅरेज बांधून कृष्णा नदीतील पाणी एकूण ५ टप्प्यांद्वारे उचलण्यात येणार आहे. त्यात सातारा जिल्ह्याच्या ३ गावांमधील ६०० हेक्टर, सांगली जिल्ह्याच्या २०६ गावांमधील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील ३१ गावांमधील २० हजार हेक्टर अशा २४० गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास लाभ देण्याचा प्रस्ताव आहे.

 व्हिडीओ पहा- 

कायम दुष्काळी अशा खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला या तालुक्यांनाही योजनेचा लाभ होणार आहे.  या योजनेच्या टप्पा क्र. १ ते ५ तसेच पुणदी व विसापूर उपसा सिंचन योजनेची सर्व कामे पूर्ण आहेत. योजनेच्या एकूण ४५१ किलोमिटर पैकी ४४६ किलोमीटर  लांबीचे कालवे पूर्ण व प्रवाहित झाले आहेत. उर्वरित कालवा कामे जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पाटील म्हणालेत. 

खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सांगोला, माण व खटाव तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रालगत असली तरी सिंचनापासून वंचित आहेत. योजनेच्या उरलेल्या गावात पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक आराखडा तयार झाला आहे, त्यानंतर निविदा काढून पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या योजनेतील पाण्याच्या फेरनियोजनाचा संबंध हा कृष्णा लवादाच्या निर्णयाशी असल्याने संबंधित वकीलांचा सल्ला घेण्यात आला, या सर्व प्रक्रियेला त्यामुळे वेळ लागला असून आता फेरनियोजनाचे काम (Water re-planning of Tembhu) अंतिम टप्प्यात आहे. कृष्णा खोरे महामंडळाकडून यासंदर्भातील प्रस्ताव प्राप्त झाल्याचंही पाटील यांनी नमूद केलंय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com